ठाण्यातील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार?, लाईट अर्बन रेल ट्रान्झिट प्रकल्प राबवणार

ठाण्यातील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार?, लाईट अर्बन रेल ट्रान्झिट प्रकल्प राबवणार

मुंबईः  ठाण्यात बरीच वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते. आता वाहतूक कोंडीतून ठाणेकरांची लवकरच सुटका होणार आहे. ठाणे शहरातील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी लाईट अर्बन रेल ट्रान्झिट प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं म्हटलं जातेय. त्यामुळे ही बातमी ठाणेकरांसाठी आनंदाची ठरणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत ठाण्यात २६ किमी उन्नत मार्ग आणि ३ किमी भुयारी मार्गाची लाईट मेट्रो धावेल. 

ठाण्यातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड सामना करावा लागतो. त्यामुळे ही बातमी ठाणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हा नवा पर्याय समोर आहे. ठाण्यात एलआरटी म्हणजेच लाईट अर्बन रेल ट्रान्झिट प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या सुरुवातीला ३ कार रेल आणि नंतर ६ कार रेल डब्यांचीही लाईट मेट्रो ठाण्यात धावणार आहे. 

७ हजार १६५ कोटींचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. ही लाईट मेट्रो प्रतितास ८० किमी वेगानं धावणार आहे. मेट्रोची ताशी प्रवासी क्षमता २३ हजार ३२० इतकी असेल. 

हा एलआरटी प्रकल्प नेमका काय आहे? 

लाईट अर्बन रेल ट्रान्झिट म्हणजे एलआरटी. जगातल्या विविध देशांमध्ये सध्या एलआरटी ही सेवा उपलब्ध आहे. तसंच ही सेवा अतिशय सुरळीतपणे सुरु आहे. ज्या ज्या भागात मेट्रो अशक्य आहे. किंवा ज्या ठिकाणी कमी रुंदीचे रस्ते आहेत. त्या ठिकाणी एलआरटी हा एक चांगला पर्याय उपलब्ध होतो. 

सद्यपरिस्थितीत ठाणे महापालिकेनं या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी एक प्रस्ताव तयार केला. या प्रकल्पात मेट्रो प्रकल्पाहूनही खर्च कमी येणार आहे. तसंच या प्रकल्पासाठी लागणारी ऑपरेशनल कॉस्टही कमी असेल. 

ठाण्यातून जाणाऱ्या मुख्य दोन मेट्रो मार्गांना जोडण्यासाठी हा एक जलद पर्याय असणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकाला जोडण्यासाठीही हा एक चांगलाल पर्याय असेल. ठाणातल्या नागरिकांचा प्रवास कमी वेळात होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामनाही ठाण्यातल्या नागरिकांना करावा लागणार नाही. येत्या चार वर्षांमध्ये ठाण्यात एलआरटी प्रकल्प उभा राहिल्यास त्याचा सर्वात जास्त फायदा ठाणे पालिका आणि ठाणेकरांना होईल.

यासंदर्भात ठाण्याच्या महापौरांनी सांगितलं की, २२ स्थानकांच्या या प्रकल्पातील २० स्थानकं उन्नत असतील. तर २ स्थानकं भुयारी असणारेत. मुख्य मेट्रोला स्टेशन कनेक्टिव्ही नसल्यानं नव्या प्रकल्पात मात्र यावर कनेक्टिव्ही देण्यात येणार आहे. 

Thane City heavy traffic problem metro lrt project

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com