अपहरण करुन खंडणी मागितल्याप्रकरणी माजी नगरसेवक कुणाल पाटीलसह दहा बारा जणांवर गुन्हा दाखल

अपहरण करुन खंडणी मागितल्याप्रकरणी माजी नगरसेवक कुणाल पाटीलसह दहा बारा जणांवर गुन्हा दाखल

डोंबिवली - उसने घेतलेल्या पैशांच्या व्यवहारावरुन रिक्षा चालकाचे अपहरण करुन व खंडणी मागितल्याप्रकरणी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्यासह दहा ते बारा जणांविरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल पाटील यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावत यामागे राजकीय नेत्याचा हात असल्याचा आरोप केला आहे. 

पिसवली येथे राहणारा सुमित सिंग (वय 24) हा रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतो. त्याने दाखल केलेल्या तक्रारीत मार्च 2020 मध्ये रिक्षाच्या दुरुस्तीसाठी सुमित याने राजन दुबे व रोहीत राठोड याच्याकडून 30 हजार रुपये व्याजाने घेतले होते. सुमित याने राठोड याला संपूर्ण पैसे परत केले होते. दहा दिवसांपूर्वी सूचक नाका येथे सुमित रिक्षा चालवित असताना राठोड याने सुमितला उसने घेतलेल्या पैशांचे 6 हजार रुपये व्याज बाकी असल्याचे सांगितले. त्याला व्यवहार पूर्ण झाल्याचे सांगितल्याने त्याने रिक्षाचालक सुमितला जीवे मारण्याची धमकी दिली. 16 फेब्रुवारीला दुपारी 1.30 च्या सुमारास सुमित घरी जात असताना सचिन माने, पांडे याच्यासोबत आलेल्या तीन ते चार जणांनी रिक्षा अडवून मारहाण करीत फरफटत नेऊन रस्त्याच्या कडेला सोडून दिले. सुमितच्या मित्राने त्याला घरी नेले.

त्यानंतर वडिल व भावाने सुमितला शास्त्रीनगर हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले. त्यानंतर धिरज पाटील व माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी त्याला फोन करुन घरी येऊन भेटण्यास सांगितले. 17 फेब्रुवारीला दुबे याला जाब विचारण्यासाठी सुमित भाऊ व वडिलांसह गेला असता तेथे चार ते पास इसम आल्याने त्यांनी जिवाच्या भितीने तेथून पळ काढला. 19 फेब्रुवारीला सुमित घरी असताना त्याच्या घरी सचिन माने, पांडे व तीन ते चार व्यक्ती येऊन त्याला मारहाण करुन गाडीत घालून एका खोलीवर घेऊन गेले. तेथे कुणाल पाटील यांनी मारहाण करीत रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवित दुबे याचा मॅटर मिटवून टाक अशी धमकी देत पुन्हा घरी आणून सोडले. भितीमुळे रिक्षाचालक सुमितने तक्रार दाखल केली नव्हती. मात्र 16 व 17 फेब्रुवारीला झालेल्या मारहाणीचे चित्रीकरण त्यांना मोबाईलवर प्राप्त झाल्याने त्याने बुधवारी मानपाडा पोलिस ठाण्यात कुणाल पाटील सह दहा ते बारा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी कुणाल पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधत सांगितले, माझ्या वरील सर्व आरोप बिनबुडाचे असून राजकीय हेतूने मला बदनाम करण्याचा हा विरोधकांचा डाव आहे. महेश पाटील यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी असून सुनावणी अगोदर मला एखाद्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला जातो. जेणेकरुन मी कोर्टात पोहोचू नये. यापूर्वीही असे झाले असून माझे नाव त्यात जाणीवपूर्वक गोवले गेल्याचे सिद्ध झाले आहे. आताही पोलिसांनी याची सखोल चौकशी करावी अशी मागणी आहे. यामध्ये ठाण्यातील एका मोठा नेत्याचा हात असल्याचा आरोपही कुणाल यांनी यावेळी केला.

-------------------------------------------

thane crime marathi news former corporator Kunal Patil booked kidnapping ransom latest updates

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com