धक्कादायक! 12 वर्षीय मुलीला पहिल्यांदाच आली मासिक पाळी; अफेअरच्या समजातून भावानं घेतला जीव : Thane Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

धक्कादायक! 12 वर्षीय मुलीला पहिल्यांदाच आली मासिक पाळी; अफेअरच्या समजातून भावानं घेतला जीव

ठाणे : लैंगिक शिक्षणाच्या अभावातून काय भीषण गोष्टी घडू शकतात याचं एक ताजं उदाहरण समोर आलं आहे. एका ३० वर्षीय भावानं १२ वर्षीय छोट्या बहिणीला गैरसमजातून बेदम मारहाण करत तिची हत्या केली. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळं अवघा महाराष्ट्र हादरला आहे. पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. (Thane Crime News Girl gets her 1st period brother feels its affair and kills her)

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत्यू पावलेली १२ वर्षीय मुलगी उल्हासनगरमध्ये सख्खा मोठा भाऊ आणि वहिणीसोबत राहत होती. घटना घडली त्यावेळी या मुलीला पहिल्यांदाच मासिक पाळी आली होती. पण तिच्या भाऊ आणि वहिणीला वाटलं की तिचं इतर कोणत्या मुलासोबत अफेअर असेल शाररिक संबंध आल्यानं तिला हा त्रास झाला असेल. याबाबत भावानं आपल्या अल्पवयीन बहिणीकडं या रक्तस्त्रावाबाबत विचारणाही केली. पण तिला हा रक्तस्त्राव नेमका कशामुळं झाला याचं व्यवस्थित स्पष्टीकरण देता आलं नाही.

"व्यवस्थित उत्तर देता न आल्यानं चिडलेल्या भावानं तिला बेदम मारहाण केली, या मारहाणातील ती गंभीररित्या जखमी झाल्यानं जमिनीवर कोसळली. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांना उपचारांपूर्वीच तिला मृत घोषित केलं," अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर कड यांनी दिली.

टॅग्स :ThaneMumbai News