स्टेरॉईडच्या अतिसेवनामुळे डोक्यावर परिणाम; जिम ट्रेनर तरुणाचा जन्मदात्यांवर चाकू हल्ला, आईचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Thane Crime News

स्टेरॉईडच्या अतिसेवनामुळे डोक्यावर परिणाम; जिम ट्रेनर तरुणाचा जन्मदात्यांवर चाकू हल्ला, आईचा मृत्यू

Thane Crime News: ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिम ट्रेनर म्हणून काम करत असलेल्या मुलाने जन्मदात्या आई-वडिलांवर चाकूने सपासप वार करून जखमी केले. या हल्ल्यात आरोपीच्या आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून वडिल गंभीर जखमी आहेत.

आरोपीचा आई-वडिलांबरोबर वाद झाला होता. या रागातून त्याने हल्ला केला. आई विनिता यांचा मृत्यू झाला आहे तर वृद्ध वडील विलास यांच्यावर घोडबंदरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून. संकल्प भाटकर असे आरोपी तरुणाचे नाव आहे. तर विनिता विलास भाटकर असे मृत महिलेचे नाव असून वडिल विलास मुकुंद भाटकर गंभीर जखमी झाले आहेत.

आरोपी संकल्प हा मुंबई श्री २०१९ चा मानकरी होता. तसेच तो एका जिममध्ये ट्रेनिंग देण्याचे काम करतो. शेजारच्या लोकांनी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,आरोपी मोठ्या प्रमाणात स्टेरॉईडचं सेवन करत होता. त्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता.

चित्रपटाच्या शूटिंगसाठी आलेल्या 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार

मुंबई,मरीन ड्राईव्ह परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चित्रपटाच्या शूटिंगसाठी हरियाणावरून मुंबईत आलेल्या एका १९ वर्षीय तरुणीवर तिच्याच सहकाऱ्याने मरीन ड्राईव्ह परिसरात बलात्कार केला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या ३५ वर्षीय आरोपी मित्राला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांना ओळखतात. ते बुधवारी हरियाणातून चित्रपटाच्या शूटिंगसाठी एकत्र मुंबईत आले होते. रविवारी शूटिंग संपल्यानंतर १९ वर्षीय तरुणी आणि तिचा ३८ वर्षीय सहकारी मरीन ड्राईव्ह परिसरातील एका हॉटेलमध्ये थांबले होते.

पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीने मित्राने रात्री तिच्या रुमची बेल वाजवली. दार उघडताच त्याने रुममध्ये जबरदस्तीने प्रवेश केला. त्यानंतर आरोपीने पीडितेवर बलात्कार केला. पीडितेने विरोध केला असता, तिला जीवे मारण्याची धमकी दिली. रविवारी रात्रभर तो तिच्यावर बलात्कार करत राहिला.

टॅग्स :policecrime