जिल्हा रुग्णालयाच्या स्थलांतराचा पेच सुटला

जिल्हा रुग्णालयाच्या स्थलांतराचा पेच सुटला

ठाणे - जीर्ण झालेल्या ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या स्थलांतराचा पेच अखेर सुटला आहे. या रुग्णालयातील विविध विभाग शहरातील मनोरुग्णालय व इतर आरोग्य केंद्रांमध्ये हलविण्यात येणार आहेत. तसेच नर्सिंग केंद्रातील विद्यार्थ्यांना मालवणी येथील सामान्य रुग्णालय, अथवा कामा व आल्ब्लेस स्त्री रुग्णालय या पर्यायी जागा दिल्या जाणार आहेत. निवासासह पुढील प्रशिक्षणही त्याच रुग्णालयांत दिले जाईल, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली. त्यामुळे नर्सिंग केंद्रातील विद्यार्थ्यांचा संभाव्य द्राविडी प्राणायाम टळणार आहे.

ठाण्यातील विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यासाठी त्यातील काही विभाग मनोरुग्णालयाजवळील आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीत हलविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नूतनीकरणाचे काम टप्प्यांमध्ये केले जाणार असून पहिल्या टप्प्यात २० विभाग स्थलांतर होणार आहेत. सर्व विभाग शहरात स्थलांतरित केले जाणार असले तरी नर्सिंग प्रशिक्षण केंद्राला मात्र शहराबाहेरील जागा निश्‍चित केली आहे. येथील विद्यार्थ्यांसाठी मालवणी येथील जिल्हा रुग्णालय अथवा कामा व आल्ब्लेस स्त्री रुग्णालय यांपैकी एका जागेची निवड करणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांचा विचार करता त्यांना निवासाबरोबरच अभ्यासक्रमही मुंबईमध्येच पूर्ण करता येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

रुग्णालयाच्या आवारातील नर्सिंग केंद्रासाठी मुंबईतील सामान्य रुग्णालय, अथवा कामा व आल्ब्लेस स्त्री रुग्णालय या पर्यायी जागा दिल्या जाणार आहेत. नर्सिंग केंद्रातील विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही. त्यांना निवासाच्या ठिकाणीच अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. 
- डॉ. कैलास पवार,  जिल्हा शल्यचिकित्सक

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com