ठाणे जिल्ह्यात कुष्ठरोग रुग्णांच्या संख्येत वाढ

ठाणे जिल्ह्यात कुष्ठरोग रुग्णांच्या संख्येत वाढ

मुंबईः  गैरसमजुती, रोगाबाबतची अंधश्रद्धा आणि भीतीच्या विळख्यात अद्याप असलेल्याने कुष्ठरोगाचे सातत्याने नवे रुग्ण आरोग्य विभागाच्या हाती लागत आहेत. त्यात ठाणे जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत कुष्ठरोगाबाबत करण्यात येणाऱ्या जनजागृती आणि शोध अभियानांतर्गत घरोघरी जाऊन करण्यात सर्वेक्षणात नवीन रुग्ण समोर येत आहे. त्यात मागील वर्षी 2019 मध्ये राबविण्यात आलेल्या या शोधमोहिमेत 2018 पेक्षा आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 46 ने वाढ झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. 

वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत असली तरी काही आजारांची नावे निघताच आजही भुवया उंचावल्या जात आहेत. या यादीत लैंगिक आजारांसह कुष्ठरोगाचाही समावेश आहे. याबाबत जनप्रबोधनाचे कार्य सातत्याने होत असले तरी नव्या रुग्णांची होणारी नोंद हेच चित्र दिसून येत असून ते चिंताजनक असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. 

आरोग्य विभागाकडून प्रत्येक जिल्हा निहाय तीन महिन्यांसाठी संशोधन तसेच कुष्ठरोग तपासणी मोहिम राबविली जाते. ठाणे जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातही कुष्ठरोग मोहिम राबविण्यात येत असते. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात नवीन रुग्णांची नोंद करण्यात येत असते. यामध्ये भिवंडीमध्ये शहापूर आणि मुरबाड तालुक्यात नव्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. 

जिल्ह्यातील ग्रामीण भागांवर अजूनही कुष्ठरोगाचा पगडा असल्याचे दिसून येते. या रोगाबाबत असलेले गैरसमज, भागातील जुन्या कुष्ठरोग्यांची अपुरी घेतली जाणारी काळजी, परिणामी होणारा संसर्ग अशा अनेक कारणांमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुष्ठरोग अद्यापही आपले अस्तित्व दाखवत आहे. 

दरम्यान, आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येणाऱ्या जनजागृती अभियानामुळे मागील वर्षी एप्रिल 2017 - मार्च 18 मध्ये 508 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर एप्रिल 2018 ते जानेवारी 2019 आतापर्यंत 638 रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यात ठाणे जिल्ह्यात  2018 मध्ये राबविण्यात आलेल्या कुष्ठरोग निवारण पंधरवडयात 221 नवीन कुष्ठरोगी रुग्णांचा शोध घेण्यात आला होता. त्यात  2019 मध्ये राबविण्यात आलेल्या कुष्ठरोग निवारण पंधरवडयात 267 नवीन रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे 2018 पेक्षा 2019 मध्ये आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 46 ने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 

आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात नवीन कुष्ठरोग मोहिम राबविण्यात येत असते. या मोहिमेतंर्गत अधिकाधिक रुग्णांची नोंद होऊन, त्यांच्यावर उपचार करणे सोपे जाते, याविचाराने खास कुष्ठरोगाच्या निवारण हेतूने ही मोहिम सुरू करण्यात येत असते. यावेळी विटभट्टी आणि स्थलांतरीत होऊन आलेल्या रुग्णांमध्ये कुष्ठरोगाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. त्यात यंदा कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी करण्यात आलेली टाळेबंदीमुळे अनेक रुग्णांना घराबाहेर पडता आले नाही. त्यामुळे अशा रुग्णांचा शोध घेऊन त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे.

कुष्ठरोग असलेल्या रुग्णांशी भेदभाव करु नये, असे रुग्ण आढळून आल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. तसेच कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होतो. त्यात पुरेशा प्रमाणात औषधे आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहेत. 
डॉ. गीता काकडे, सहायक संचालक, कुष्ठरोग आणि क्षयरोग आरोग्य विभाग.

------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Thane district leprosy patients cases Increase

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com