ठाणेकरांनो सावधान! जिल्ह्यात कोरोनाबाधितांसह मृतांची संख्या देखील वाढतोय, दिवसभरात इतके मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

या वाढत्या बाधितांच्या संख्येसह वाढत्या मृतांच्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागावरील ताण वाढत आहे. 

ठाणे : ठाणे जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 1 हजार 510 बाधितांची तर, 39 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर, जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 43 हजार 926 तर मृतांची संख्या 1 हजार 308 झाली आहे. या वाढत्या बाधितांच्या संख्येसह वाढत्या मृतांच्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागावरील ताण वाढत आहे. 

नक्की वाचा : अरे वाह! जेजे-सेंट जॉर्ज रुग्णालयाला मिळणार अपडेटेड व्हेंटिलेटर; कंपनीने घेतले "ते" व्हेंटिलेटर परत..

सोमवारी कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्नात पुन्हा एकदा 413 रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील बाधितांची संख्या 9 हजार 499 तर, मृतांची संख्या 144 इतकी झाली आहे. ठाणे महानगर पालिका हद्दीत 268 बाधितांची नोंद करण्यात आली असून त्यामुळे बाधितांची संख्या 10 हजार 999 वर गेली आहे. तर 14 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 416 झाली आहे. नवी मुंबई महापालिकेत 164 रुग्णांची तर, आठ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 7 हजार 957 तर, मृतांची संख्या 252 वर पोहोचला आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात 88 बधीतांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 2 हजार 407 वर पोहोचली. 

हेही वाचा : दिलासादायक बातमी! राज्यातील 2 लाख एचआयव्ही ग्रस्तांमध्ये फक्त 'इतके' जण कोरोनाबाधित.. 

मीरा भाईंदरमध्ये 157 रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 4 हजार तर मृतांची संख्या 166 इतकी झाली आहे. उल्हासनगर 159 रु ग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 2 हजार 969 तर तिघांचा मृत्यु झाला असून त्यामुळे मृतांची संख्या 57 झाली आहे. अंबरनाथमध्ये 56 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 2 हजार 252 तर पाच जणांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 75 झाली आहे. बदलापूरमध्ये 38 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर बाधितांची संख्या 1 हजार 11 झाली आहे. तर एकाचा मृत्यु झाला असून त्यामुळे मृतांची संख्या 17 झाली आहे. तर, ठाणे ग्रामीण भागात 167 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 2 हजार 361 वर गेली आहे.

In Thane district number of deaths and new corona infections has also increased


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Thane district number of deaths and new corona infections has also increased