Nepal Plane Crash: ठाण्यातल्या कुटुंबाला कोर्टाने जवळ आणलं पण काळाने हिरावलं!

नेपाळमधल्या विमान दुर्घटनेत एकाच कुटुंबातल्या चार जणांचा समावेश होता. हे चौघे सुट्टी एन्जॉय करायला गेले होते.
Nepal Plane Crash
Nepal Plane Crashesakal

नेपाळमध्ये २५ जणांना घेऊन जाणारं विमान कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या विमानात २२ प्रवासी आणि तीन कर्मचारी होती. यामध्येच महाराष्ट्रातल्याही एका कुटुंबाचा समावेश होता. कोर्टाच्या आदेशामुळे हा सगळा परिवार एकत्र येण्याची स्वप्नं बघत होता. मात्र या अपघाताने त्यांची स्वप्नं कायमची हिरावून घेतली. (Maharashtra Family in Nepal Plane Crash)

Nepal Plane Crash
नेपाळ लष्करानं शोधलं दुर्घटनेचं ठिकाण; चक्काचूर झालेल्या विमानाचा PHOTO आला समोर

अशोक त्रिपाठी, वैभवी बांदेकर आणि त्यांची दोन मुलं धनुष आणि मुलगी रितिका हा परिवार अद्याप बेपत्ता आहे. अशोक आणि वैभवीचा घटस्फोट झाला होता. मात्र कोर्टाने या दोघांना दरवर्षी पूर्ण परिवारासोबत काही काळ एकत्र राहण्यास सांगितलं होतं. याच आदेशामुळे त्यांनी नेपाळमध्ये १० दिवस फिरायला जायचं ठरवलं होतं. तीन दिवसांपासून हे कुटुंब नेपाळमध्येच (Nepal Plane Crash) होतं. तिथल्याच एका शहरात फिरायला जायचं म्हणून हे या विमानातून चालले होते.

Nepal Plane Crash
नेपाळ : 'तारा एअरलाइन'चे विमान बेपत्ता; 4 भारतीयांसह 22 प्रवासी विमानात

वैभवी एका कंपनीमध्ये उच्चपदस्थ होती. तर अशोक त्रिपाठी ओडिशाचे रहिवासी असून ते भुवनेश्वरमधल्या खासगी कंपनीत काम करत होते. अशोक आणि वैभवी यांनी प्रेमविवाह केला होता. यांचा मुलगा धनुष २२ वर्षांचा असून तो सध्या महाविद्यालयीन शिक्षण होता. तर मुलगी रितिका १८ वर्षांची होती. या दुर्घटनेदरम्यान, २२ मृतदेह हाती लागले आहेत. तसंच विमानातला ब्लॅक बॉक्सही सापडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com