ठाणे: स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

ठाण्यात आतापर्यंत १३३ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. तर 7 जणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. उपचारासाठी भरती होणाऱ्या रुग्णांना काही रुग्णालयांमधल्या अतिदक्षता विभागात इतर रुग्णांबरोबर एकत्रच ठेवले जात असल्याने स्वाइन फ्लूचा धोका वाढतच चालला आहे.

ठाणे - पावसाळा सुरु झाल्याने ठाण्यात साथीच्या रोगांनी डोके वर काढले असून, ठाण्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

ठाण्यात आतापर्यंत १३३ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. तर 7 जणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. उपचारासाठी भरती होणाऱ्या रुग्णांना काही रुग्णालयांमधल्या अतिदक्षता विभागात इतर रुग्णांबरोबर एकत्रच ठेवले जात असल्याने स्वाइन फ्लूचा धोका वाढतच चालला आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी वेगळा कक्ष निर्माण करण्याच्या सूचना ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिल्या आहेत.

या संदर्भात ठाण्यातल्या सगळ्या रुग्णालयांची पाहणी केली जाणार आहे. ही पाहणी करण्यासाठी दिल्लीचं एक पथक आज ठाण्यात येत आहे.

Web Title: Thane: Increase in swine flu patients