ठाणे कारागृह अधीक्षकाकडून पोलिस महिलेचा छळ? 

ठाणे कारागृह अधीक्षकाकडून पोलिस महिलेचा छळ? 

ठाणे : ठाणे कारागृहातील पोलिस कर्मचारी महिलेचा कारागृह अधीक्षकांकडून मानसिक व शारीरिक छळ होत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्‍ते डॉ. राजू वाघमारे यांनी लेखी तक्रारीद्वारे विशेष पोलिस महानिरीक्षक राजवर्धन यांच्याकडे केला आहे. याप्रकरणी अधीक्षक नितीन वायचळ यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. महानिरीक्षक राजवर्धन यांनी हे प्रकरण ठाणे जिल्हाधिकारी स्तरावर चौकशीसाठी पाठवल्याचे सांगितले. 

ठाणे कारागृहात 2013 पासून कार्यरत असलेल्या पोलिस महिलेने कारागृह अधीक्षक नितीन वायचळ हे छळ करत असल्याचे बहिणीला सांगितले. त्यानुसार बहिणीने सर्व प्रकार कॉंग्रेस प्रवक्‍ते डॉ. राजू वाघमारे यांना सांगितला. त्यानंतर डॉ. वाघमारे यांनी वायचळ यांना फोनवर संपर्क साधून आपल्या पक्षातील सहकारी महिलेची बहीण ठाणे कारागृहात कार्यरत आहे. तिला सहकार्य करावे, असे कळवले. मात्र त्याची दखल न घेता वायचळ यांनी संबंधित पोलिस महिलेचा छळ सुरूच ठेवल्याचे डॉ. वाघमारे यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक राजवर्धन यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अद्याप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झालेली नाही. 

राजकीय दबावातून वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्य? 

ठाणे कारागृहात बंदिस्त असलेल्या आणि नंतर सुटका झालेल्या कैद्यांसोबत संबंधित पोलिस महिलेने आक्षेपार्ह संबंध ठेवल्याचे समोर आले होते. याबाबतचे आक्षेपार्ह फोटोही असल्याची चर्चा आहे. याप्रकरणी त्या पोलिस महिलेला मेमोही देण्यात आला होता. या मेमोनुसार संबंधित महिला सेवेतून बडतर्फ होण्याची तरतूद असल्याने तिने राजकीय दबावातून वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com