ठाणेकरांनो लसीकरणाला जाण्याआधी ही बातमी वाचा

त्यातून लसीकरण केंद्रच कोरोना प्रसारक बनण्याची शक्यता
Vaccination
VaccinationRepresentative

ठाणे: राज्यात लसीकरण (vaccination drive) सुरु असले, तरी पुरेशा प्रमाणात लसी उपलब्ध होत नाहीयत. त्यामुळे अनेक लस केंद्रांवर (vaccine center) लसींचा तुटवडा असतो. नागरिक लसीकरणासाठी जातात पण लसी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना माघारी फिरावे लागते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरुकता आलीय. त्यामुळे सर्वच वयोगटातील नागरीक लसीकरण केंद्रावर गर्दी करतायत. (Thane List of Vaccine Centers Open on Saturday)

त्यातून लसीकरण केंद्रच कोरोना प्रसारक बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपॉईंटमेंट आणि स्लॉट बुक करुनच लस केंद्रावर या, असे प्रशासनाकडून नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Vaccination
मुंबईत अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ५० हजारच्या आत...

आता मुंबई महानगर पालिका, ठाणे महापालिका टि्वटरवरुन कुठलं लसीकरण केंद्र सुरु आहे. तिथे किती वेळात लस मिळेल, त्याची सोशल मीडियावरुन आगाऊ माहिती देतात. आता सुद्धा ठाणे महापालिकेने उद्या कुठली लसीकरण केंद्रे, किती वेळासाठी खुली असतील, याची माहिती देत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com