Sat, June 3, 2023

Mumbai Local Accident : आसनगाव रेल्वे स्टेशनमध्ये वृद्ध महिलेला लोकलची धडक; महिलेचा मृत्यू
Mumbai Local Accident : आसनगाव रेल्वे स्टेशनमध्ये वृद्ध महिलेला लोकलची धडक; महिलेचा मृत्यू
Published on : 23 March 2023, 8:48 am
मुंबईत लोकल ट्रेनची धडक बसल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रेल्वेचा रुळ ओलांडून जाताना हा अपघात झाला आहे. कसारा इथून आलेल्या ट्रेनची धडक या महिलेला बसली.
या महिलेचं नाव सीताबाई पांढरे असं आहे. कसारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं जात असलेल्या लोकल ट्रेनने या महिलेला धडक दिली. त्यात तिचा मृत्यू झाला. यानंतर आसनगावकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी लोकल वाहतूक खोळंबली आहे.
या मार्गावरच्या लोकल गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. फ्लायओव्हर नसल्याने हा अपघात झाल्याचं प्रवाशांनी सांगितलं आहे. आसनगाव रेल्वे स्थानकातील २०१८ साली तोडलेला ओव्हरब्रीज अजूनही बांधलेला नाही. त्यामुळेच हा अपघात झाल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे.