ठाणे : मराठीला हिणवणाऱया गुजराती बिल्डरचा 'मनसे स्टाईल' बंदोबस्त (Video)

MNS-Thane
MNS-Thane

ठाणे : नैापाडा येथील 'सुशय' सोसायटीमधील दोन रहिवाशांमधील वाद हा मराठी आणि गुजरातीच्या अस्मितेपर्यंत पोचला आहे. या सोसायटीमधील गुजराती भाषिक बिल्डरने एका मराठी माणसाला मारहाण केल्याची घटना घडली होती. त्या वादात मनसेने उडी घेतली असून हसमुख शहा नावाच्या या बिल्डरला जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी थेट मुंबईत गाठून त्याच्याकडून माफीनामा सादर करुन घेतला आहे. एवढेच नव्हे, तर माफीनंतर या बिल्डरचा 'मनसे स्टाईल'ने बंदोबस्त केल्याचे समजते.

नाैपाडामधील विष्णूनगर परिसरातल्या सुशय सोसायटीत राहुल पैठणकर आपल्या कुटुंबासह राहतात. याच इमारतीत हसमुख शहा राहवयास आलेले आहेत. काही दिवसांपूर्वीच म्हणजे 11 तारखेला या इमारतीच्या लिफ्टचा दरवाजा उघडा राहण्यावरुन राहुल आणि हसमुख यांच्यामध्ये वाद झाला होता. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या हसमुख शहा याने थेट आपल्या मुलांच्या मदतीने राहुल पैठणकारांना मारहाण केली आणी त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ केली होती.

ही मारहाण इमारतीच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली. विशेष म्हणजे यावेळी शहा यांच्याकडून पैठणकर यांना मराठी म्हणून हिणवल्याचे कळते. त्याची दखल घेऊन मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी शहा जेथे भेटतील तिथे त्यांना मारहाण करण्याचा इशारा दिला होता. अशावेळी शहा मुंबईत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जाधव आपल्या कार्यकर्त्यांसह गेले. यावेळी त्यांनी एक व्हिडिओ तयार करुन शहा यांना मराठी माणसांची कान धरुन माफी मागण्यास सांगितले.

तसेच राज ठाकरे यांचे आदेश असल्याने व्हिडिओसमोर मारहाण करणार नसलो तरी व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर मनसेच्या पद्धतीने शहा यांचा बदोबस्त केल्याचे सांगण्यात आले. नैापाडा हा परिसर ठाण्यातील मराठी बहुल वस्ती असलेला परिसर म्हणून ओळखला जातो. अशावेळी या परिसरात मराठी माणसाला हिणवले गेल्याने याबाबतची माहिती मनसेच्या नेत्यांना देण्यात आली होती.

याप्रकरणी नैापाडा पोलिस ठाण्यात पैठणकर आणि शहा या दोघांच्याही तक्रारी नोंदवून घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधीत प्रकरणामध्ये कोणालाही अद्याप अटक करण्यात आलेलं नाही. तसेच या मारामारीत कोणताही भाषिक वाद झालेला नसल्याचा दावा नौपाडा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे पैठणकर यांच्या हिंतचिंतकांनी त्यांना झालेल्या मारहाणीचा व्हीडीओ व्हायरल करण्याबरोबरच मनसेच्या पदाधिकाऱयांना याची माहिती दिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com