गावठी बॉम्बप्रकरणी आणखी एकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

ठाणे - रानडुकरांच्या शिकारीसाठी गावठी बॉम्ब तयार करणाऱ्या आणखी एकाला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी (ता. 27) रात्री अलिबाग येथून अटक केली. रमेश पवार (वय 50) असे त्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने 290 गावठी बॉम्ब घेऊन ते विक्रीसाठी आलेल्या प्रवीण पाटील (वय 34) याला शिळ फाटा भागातून अटक केली होती. फटाक्‍याच्या दारूपासून हे गावठी बॉम्ब बनवण्यात येत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.

शिळ फाटा येथे प्रवीण पाटील हा गावठी बॉम्ब विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनिट एकचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून प्रवीण याला ताब्यात घेतले होते.

Web Title: thane mumbai news one arrested in bomb case