मित्राच्या मदतीसाठी पोलिस भरतीप्रक्रियेत सहभागी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

ठाणे -  ठाणे पोलिस भरतीप्रक्रियेत मित्राच्या मदतीसाठी पोलिस भरतीत स्वत:चा दुसऱ्यांदा बोगस अर्ज करणारा सांगली पोलिस दलातील पोलिस शिपाई संग्राम साळुंखे याला ठाणे पोलिसांनी बुधवारी पकडले. शारीरिक चाचणी परीक्षेत मित्राला मदत करण्यासाठी संग्राम याने हा प्रताप केला. संग्राम याच्यावर सांगली पोलिस कारवाई करतील, असे ठाणे पोलिसांनी सांगितले.

काही दिवसांपासून ठाणे पोलिस दलात शिपाईपदाच्या 238 जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू आहे. या भरतीप्रक्रियेत सांगली पोलिस दलात असलेला संग्राम साळुंखे याचा मित्रही सहभागी झाला होता. मित्राला या भरतीप्रक्रियेत शारीरिक चाचणीत चांगले गुण मिळावेत म्हणून त्याच्या मदतीसाठी संग्राम याने बोगस अर्ज केला होता. त्याच वेळी मैदानावर शारीरिक चाचणीसाठी आलेल्या एकाने पोलिस शिपाई संग्राम साळुंखे याला ओळखले. साळुंखे हा 2014-15 मध्ये पोलिस दलात भरती झाला आहे. तो परत मैदानी चाचणीसाठी कसा काय उतरला आहे, याची खात्री केल्यानंतर सर्व प्रकार ठाणे पोलिसांच्या कानावर घातला. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी सांगली पोलिसांना संग्राम याच्यावर कारवाई करण्यात यावी, असे पत्र पाठवले आहे.

Web Title: thane mumbai news police recruitment crime