तक्रार केल्याने महिलेला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

ठाणे - समोसा आंबट असल्याची तक्रार करणाऱ्या एका महिलेला हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी मारहाण करीत विनयभंग केला. ठाणे रेल्वे स्थानकाजवळ हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी कोपरी पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरी परिसरात पीडित महिला राहते. उदय पुजारी, कृष्णा कुलकर्णी, राजेश पवार व दयाराम पांडे अशी आरोपींची नावे आहेत.

Web Title: thane mumbai news women beating