Sahar Shaikh : औरंगजेबाचं कौतुक करणारी पोस्ट; AIMIM च्या नगरसेविका सहार शेख नव्या वादात, सोशल मीडियावर टीकेची झोड

AIMIM : एमआयएमच्या ठाणे नगरसेविका सहार शेख यांनी मुघल सम्राट औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्या सोशल मीडिया पोस्टमुळे नव्या वादात सापडल्या आहेत. त्यांनी औरंगजेबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याने पूर्ण श्रद्धेने मलिक उल हिंदवर राज्य केल्याचे विधान केले.
Sahar Shaikh

Sahar Shaikh’s Aurangzeb Birthday Post Sparks Row

esakal

Updated on: 

What AIMIM Corporator Sahar Shaikh Posted : कैसा हराया’ या विधानामुळे चर्चेत आलेल्या एमआयएमच्या नगरसेविका सहार शेख पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. यावेळी त्यांच्या वादाचे कारण ठरले आहे मुघल सम्राट औरंगजेबाचे केलेले कौतुक. सहार शेख यांनी सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत औरंगजेबाच्या कारकिर्दीचा गौरव केला आहे. तसेच इतिहास कधीही पुसता येत नाही, असे विधान केले आहे. त्यांच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात असून, त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...