ठाणे महापालिकेचे फुलपाखरू चोरीला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

ठाणे -  ठाण्यात चोरट्यानी उच्छाद मांडला असून या चोरट्यांनी चक्क ठाणे महापालिकेच्या मालमत्तेवर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. शहरातील रस्त्यांच्या रुंदीकरणानंतर पालिकेने चौक सुशोभीकरण मोहीम हाती घेतली. या सुशोभिकरणात बसवण्यात आलेल्या प्रतिकृतीपैकी पोखरण रोड येथील फुलपाखरूची प्रतिकृती चोरीला गेल्याची तक्रार ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे चितळसर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.  

पोखरण रोड नंबर २ येथील चौकात हनुमान मंदिराजवळ पालिकेने झाडांवर फायबरपासून बनवलेल्या फुलपाखरुच्या प्रतिकृती बसवल्या आहेत. यातील १५ हजार रुपये किंमतीचे गुलाबी आणि जांभळ्या रंगाचे एक कृत्रिम फुलपाखरू ११ ते १२ एप्रिलदरम्यान चोरट्याने लांबवल्याची तक्रारठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्मचारी सचिन रुद्रापे यांनी केली आहे.

Web Title: Thane municipal butterfly stolen