खासगी रूग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचा ठाणे महापालिकेचा इशारा, अन्यथा...

tmc
tmc

ठाणे : शहरामध्ये कोरोनाचा सामना करण्यासाठी आणि कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी महपालिकेने खासगी रूग्णालये ताब्यात घेतली आहेत. ही रुग्णालये केवळ कोव्हिडच्या उपचारासाठी असल्याचे जाहीर झाल्यानंतर या रुग्णालयातील डॅाक्टर आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात येणे टाळले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. डॅाक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी रूग्णालयांमध्ये कामावर उपस्थित न राहिल्याने संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत.

ठाण्यात कोरोना रूग्णांवर तातडीने उपचार करता यावेत, यासाठी महापालिकेने अनेक खासगी रूग्णालये, त्यामध्ये काम करणारे डॅाक्टर आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांसह ताब्यात घेतली आहेत. त्यानंतरही कौशल्या हॅास्पिटल, होरायझन प्राईम आणि ठाणे हेल्थ केअर सेंटर या रूग्णालयातील काही डॅाक्टर्स आणि इतर कर्मचारी सेवेत हजर झालेले नाहीत. त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. ही बाब लक्षात घेवून या तीनही हॅास्पिटलमधील सेवेत हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहिता कलम 188 मधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत. महापालिकेने रुग्णालय ताब्यात घेतल्यानंतर साथ रोग नियंत्रण कायद्यानुसार तेथील सर्व कर्मचाऱ्यांना पालिकेने जाहिर केलेले आदेश अंमलात आणणे अनिवार्य आहे, मात्र त्यानंतरही शहरातील बहुसंख्य डॅाक्टरांनी मात्र रुग्णालयाकडे पाठ फिरवल्याने त्याचा फटका रुग्णांना बसतो आहे. त्याची दखल घेऊन अशा रुग्णांलयातील कारभाराची माहिती घेऊन महापालिकेचे आदेश न पाळणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती
कामावर न येणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्राधिकृत केले आहे. यात होरायझन प्राईम रूग्णालायासाठी डॅा. अनिता कापडणे, ठाणे हेल्थ केअरसाठी डॅा. शलाका खाडे आणि कौशल्या हॅास्पिटलसाठी डॅा. अश्विनी देशपांडे यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या डॅाक्टरांचा अहवाल आल्यानंतर संबधित कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे.

Thane Municipal Corporation warns doctors and staff of private hospitals to be present at work, otherwise 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com