ठाणे महापालिकेची घसरण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

ठाणे - ठाणे महापालिकेची स्मार्ट शहरांच्या यादीत झालेली घसरण धक्कादायक असून, त्याविषयी सामाजिक कार्यकर्ते आणि पालिका वर्तुळातूनही तर्कवितर्क लढवले जात आहेत. शहरातील कचरा विल्हेवाट लावण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याचा फटका शहराला बसला आहे. वाहतूक कोंडी आणि शहरातील रस्त्यांवर पार्किंगमुळे ठाण्याचे गुण घसरल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. स्थानक परिसरातील वाहतुकीच्या फसलेल्या नियोजनामुळे शहरातील सावळा गोंधळ ठाण्याच्या स्मार्टपणाला धक्का पोहचवणारा आहे. दिवा-मुंब्रा परिसरातील शहराची बकाल अवस्था आणि मुख्य शहरामधील बेकायदा बांधकामांची अतिक्रमणे यांनीही ठाणे शहराचे गुण घसरल्याचे बोलले जात आहे.

ठाणे - ठाणे महापालिकेची स्मार्ट शहरांच्या यादीत झालेली घसरण धक्कादायक असून, त्याविषयी सामाजिक कार्यकर्ते आणि पालिका वर्तुळातूनही तर्कवितर्क लढवले जात आहेत. शहरातील कचरा विल्हेवाट लावण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याचा फटका शहराला बसला आहे. वाहतूक कोंडी आणि शहरातील रस्त्यांवर पार्किंगमुळे ठाण्याचे गुण घसरल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. स्थानक परिसरातील वाहतुकीच्या फसलेल्या नियोजनामुळे शहरातील सावळा गोंधळ ठाण्याच्या स्मार्टपणाला धक्का पोहचवणारा आहे. दिवा-मुंब्रा परिसरातील शहराची बकाल अवस्था आणि मुख्य शहरामधील बेकायदा बांधकामांची अतिक्रमणे यांनीही ठाणे शहराचे गुण घसरल्याचे बोलले जात आहे. शाश्‍वत विकासाच्या दृष्टीने नियोजनशून्यता, रस्ता रुंदीकरणाच्या नावाने शहरातील हरित पट्ट्याची आमानुषपणे केली जाणारी तोड हेही ठाणे शहरासाठी चिंतेचा विषय आहे. प्रदूषणाचा प्रश्‍नही गंभीर असून, त्यामुळे ठाणे महापालिकेच्या गुणांमध्ये घसरण झाल्याची चर्चा आहे. 

Web Title: Thane Municipal Corporation's Fall