ठाणेः भिंतीला भगदाड पाडून बँक लुटीचा प्रयत्न फसला; टोळी जेरबंद

दीपक शेलार
शनिवार, 22 जुलै 2017

ठाणेः येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या भिंतीला भगदाड पाडून लुट करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आठ ते दहा जणांच्या झारखंड टोळीला ठाणे पोलिसांनी रंगेहाथ जेरबंद केले आहे, अशी माहिती अपर पोलिस आयुक्त मकरंद रानडे यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत दिली.

घोडबंदर रोडवरील ओवळा कासारवडवली येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेशेजारील राज मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या सामुहिक भिंतीला भगदाड पाडून बँक लुटीचा बेत आखण्यात आला होता. मात्र, ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली विरोधी पथकाला याची कुणकुण लागल्याने पोलिसांनी टोळीचे मनसुबे उधळून लावले. ड्रायव्हिंग स्कूलचे शटर उचकटून बँकेची भिंत फोडत असतानाच पोलिसांनी मुख्य सूत्रधार साकीम शेख याला अटक केली. त्याचवेळी बँकेबाहेर चोरीच्या स्विफ्ट मोटारीत लपून बसलेल्या आरोपींनी धूम ठोकली. मात्र, पोलिस पथकाने पाठलाग करून शाहजहान अली उर्फ काळू शेख, मोहम्मद मनारुल शेख, शाहजहान फजल शेख, मकसुद शेख, रेजाऊल शेख, शैफूददीन शेख व जगुनु शेख (सर्व राहणार जि. साहेबगंज, राज्य झारखंड, वय वर्ष 21 ते 38) आदीना अटक केली. त्यांच्याकडून पिस्तुल व कळवा येथून चोरलेल्या दोन मोटारी, दोन ऑक्सिजन सिलेंडर, भारत गॅसचा 5 किलोचा सिलेंडर आदी साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: thane news Bank robbery attempt failed; Gang arrested