बिहारमधील फरारी गुन्हेगाराला अटक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जानेवारी 2018

ठाणे - बिहारमधील कारागृहातून पलायन केलेल्या तिहेरी हत्याकांडातील गुन्हेगाराला ठाण्याच्या सिडको परिसरातून ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. परजितकुमार सिंग (वय 39) असे त्याचे नाव आहे. 

ठाणे - बिहारमधील कारागृहातून पलायन केलेल्या तिहेरी हत्याकांडातील गुन्हेगाराला ठाण्याच्या सिडको परिसरातून ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. परजितकुमार सिंग (वय 39) असे त्याचे नाव आहे. 

जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना वर्षभरापूर्वी तो बिहारच्या बक्‍सर मध्यवर्ती कारागृहातून चार साथीदारांसह फरार झाला होता. यानंतर परजितकुमार मुंबई व ठाणे परिसरात जागा बदलून राहत होता. त्याने या प्रकरणातील साक्षीदारांकडे खंडणी मागितली होती. ठाणे पोलिसांचे पथक मागील तीन महिन्यांपासून त्याच्या मागावर होते. येथील सिडको बस स्थानकावर गुन्हे शाखेच्या पथकाने परजितकुमारला अटक केली. बिहारमधील टाउन पोलिस ठाण्याच्या हद्दीत 1998 मध्ये एकाच वेळी दोन महिला आणि एका पुरुषाची हत्या परजितकुमारने केली होती. 

Web Title: thane news bihar crime