कांदा विक्रीच्या प्रलोभनाने गंडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

ठाणे - स्वस्त दरात कांदा खरेदी करून दरवाढीनंतर नफा कमावण्याचे प्रलोभन दाखवत कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या कार्गो व्यवस्थापकासह त्याच्या साथीदारावर नौपाडा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हरीश कारवा, योगेश शाह अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. यांनी तक्रारदारांची 2 कोटी 26 लाख 27 हजारांची फसवणूक केली आहे.

हिरानंदानी मेडोज येथे राहणारे अशोक चौधरी हे पाचपाखाडीत रवी इंडस्ट्रियलमधील मे. सोनू कार्गो मूव्हर्सचे संचालक आहेत. त्यांच्या कंपनीत हरीश कारवा हे व्यवस्थापक आहेत. कारवा याने कंपनीची दिशाभूल करत साथीदार शाह याच्या मदतीने स्वस्त दरात कांदा खरेदी केला होता.

Web Title: thane news cheating crime