मुख्यमंत्र्यांच्या आवाजाद्वारे फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

ठाणे - महापालिकेतील भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाजात विधान परिषदेचे आमदारकीचे तिकीट देतो, अशी बतावणी करून 10 कोटींचा गंडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल फोन आणि भारत सरकारचे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए), केंद्रीय दक्षता आयोगाची बनावट कागदपत्रे जप्त केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त मुकुंद हातोटे यांनी दिली.

याप्रकरणी अनुद शिरगावकर (वय 29), अनिल भानुशाली (31) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचा आवाज काढणाऱ्या अब्दुल अन्सारी यालाही बुधवारी दुपारी आळेफाटा येथून ताब्यात घेतले.

Web Title: thane news cheating crime