नगरसेविकेने मानधन दिले अनाथांच्या 'माई'ला...

दीपक शेलार
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

ठाणे: नगरसेवक म्हटले कि भ्रष्टाचार आणि टक्केवारी याचीच चर्चा नागरिकांमध्ये अधिक होत असते. मात्र, ठाणे महापालिकेतील भाजप नगरसेविका प्रतिभा मढवी यांनी याला छेद देत समाजऋण फेडले. अनाथांच्या माई अर्थात सिंधुताई सपकाळ यांना, त्यांनी आपणास पालिकेकडून मिळणारे मानधन अर्पण केले.  

ठाण्यातील तरूणांच्या सोहळा इव्हेंट्स ग्रुपच्यावतीने  "माई- एक कल्पवृक्षाची सावली...सिंधुताई सपकाळ ..यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम शनिवारी 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठाण्यातील जोशी–बेडेकर महाविद्यालयाच्या सभागृहात  पार पडला. यावेळी ज्येष्ठ समाजसेविका "सिंधुताई सपकाळ" यांनी त्यांच्या आयुष्यातील खडतर प्रसंगावर कशा प्रकारे मात केली याबाबत उपस्थित श्रोत्यांसमोर आपले ज्वलंत विचार मांडले. सदर कार्यक्रमास ठाणे शहर भाजपा उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी व नगरसेविका प्रतिभा मढवी प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. तेव्हा अनाथांच्या माई सिंधुताई यांच्या कार्याने प्रेरित होवून नगरसेविका प्रतिभा मढवी यांनी आपणास नगरसेवक म्हणून मिळणारे मानधन सिंधुताईंच्या आश्रमासाठी दानरूपाने त्यांच्याकडे सुपूर्द करून लोकप्रतिनिधींसमोर वेगळा आदर्श उभा केला आहे.

Web Title: thane news corporator pratibha madhvi honorarium sindhutai sapkal