नेटकऱ्यांकडून नोटांना शोकाकुल श्रद्धांजली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

ठाणे - केंद्र सरकारने वर्षभरापूर्वी चलनातून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बाद करत सर्वांना धक्का दिला होता. याला आज (ता. ८) वर्ष होत असून, सोशल मीडियावर या बंद झालेल्या नोटांना श्रद्धांजली वाहत अनेकांनी त्यांच्यावर उद्‌भवलेला बाकाप्रसंग शेअर करण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयाविषयीच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या करून जुन्या नोटांचे फोटो व्हायरल केले आहेत. फेसबुक, व्हॉट्‌सॲपवर नोटांच्या या मॅसेजेसना उधाण आले आहे.

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ ला मध्यरात्री भारतातील चलनातील ५०० व १००० रुपयांच्या नोटा बाद केल्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त सोशल मीडियावर मंगळवारपासून अनेक संदेश फिरत आहेत. या नोटांना प्रथम स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली असून, शोकाकुल परिवारात १००, ५०, २०, १० आणि ५ च्या नोटेचा समावेश करण्यात आला आहे. या फोटोसोबतच अनेकांनी त्यांना आलेले अनुभव सोशल मीडियावर शेअर केले आहेत. व्हॉट्‌सॲपवर गप्पा मारताना महिलांनी नोटाबंदीमुळे घरात साठवून ठेवलेले पैसे बाहेर निघाल्यानंतरच्या गमती-जमती शेअर केल्या आहेत.

हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतरचे बिल भरताना आई-वडिलांच्या कसे नाकीनऊ आले, याचा किस्सा तरुणाने सांगितला असून, मालमत्तेचे व्यवहार कसे विस्कटले याविषयीही अनेकांनी खुलेपणाने चर्चा केली आहे. पिगीबॅंक फोडावे लागल्याचे दुःखही काहींनी व्यक्त करत आठवणींना उजाळा दिला आहे.

Web Title: thane news Demonetisation social media

फोटो गॅलरी