ऐतिहासिक ठाण्यात ‘डिजिठाणे’चे लोकार्पण

ऐतिहासिक ठाण्यात ‘डिजिठाणे’चे लोकार्पण

ठाणे - ‘‘ठाणे शहर अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आहे. याच शहरापर्यंत देशातील पहिली रेल्वेगाडी धावली होती. त्याचप्रमाणे नव्या युगाची क्रांती समजल्या जाणाऱ्या डिजिटल क्रांतीचा भाग होत देशातील पहिले डिजिटल शहर होण्याचा मान या शहराने मिळविला असल्याने त्याचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे,’’ असे गौरवोद्‌गार शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. 

डिजिठाणे अॅप डाऊनलोड करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.gst.digithane

जगात पहिले डिजिटल शहर म्हणून इस्राईलच्या तेल अवीवचे नाव प्रसिद्ध आहे, त्यानंतर जगातील दुसरे आणि देशातील पहिले शहर होण्याचा मान ठाणे शहराने मिळविला आहे.

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आज सायंकाळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ‘डिजिठाणे ॲप’चा लोकार्पण सोहळा झाला. तेल अवीव महापालिका आणि फॉक्सबेरी कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या वेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, इस्राईलच्या तेल अवीव जाफा शहराचे महापौर डॉ. रॉन हुलदाय यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. या वेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, समीर उन्हाळे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेता मंगेश देसाई आदी उपस्थित होते.

डिजिठाणे अॅप डाऊनलोड करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.gst.digithane

‘ठाणे पूर्वी ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जात होते. आता ते डिजिटल शहर म्हणून ओळखले जाणार आहे. मुंबईबरोबर ठाण्याचीदेखील प्रगती होत आहे, याचा अभिमान असून, सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने प्रशासनाबरोबर सहकार्य केल्याने ठाण्याचा विकास होत आहे,’’ असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 

पूर्वी संवादासाठी भाषा ही खूप महत्त्वाची मानली जात होती; परंतु आता टेक्‍नालॉजी हीच भाषा म्हणून पुढे येत आहे, असेही ते म्हणाले. इस्त्राईलमधील तेल अवीव शहराचे महापौर डॉ. रॉन हुलदाय यांनीही या वेळी विचार मांडले. तेल अवीवच्या धर्तीवर ‘डिजिसिटी प्लॅटफॉर्म’ची निर्मिती केल्याबद्दल ठाणे शहरासह आयुक्त संजीव जयस्वाल यांचे त्यांनी अभिनंदन केले. ‘‘आम्ही हा प्रकल्प २०१४ मध्ये सुरू केला होता. त्यानंतर भारतातील शहरांनादेखील यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते; परंतु ठाण्याने त्यात प्रथम पुढाकार घेतला. सुरवातीला हा प्रकल्प एवढ्या लवकर सुरू होईल याबद्दल आम्ही साशंक होतो; पण ठाणे महापालिकेने वेळेत हे स्वप्न पूर्ण केले,’’ अशी शाबासकी डॉ. हुलदाय यांनी दिली.

डिजिठाणे अॅप डाऊनलोड करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.gst.digithane

‘‘ठाणे शहर केवळ मेट्रोचा विचार करीत नसून अंर्तगत मेट्रोचा विचार करीत आहे. अशाप्रकारे महापालिकेने कायम दूरदृष्टी ठेवून काम केले आहे. लोकांनी शिवसेनेला निवडून दिल्यानंतर विकासाच्या दृष्टीने डिजिटलचे ऐतिहासिक पाऊल पडत असल्याने त्याचा अभिमान वाटतो,’’ असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

डिजिठाणे अॅप डाऊनलोड करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.gst.digithane

जयस्वाल हे भारताचे झुकेरबर्ग
भारताला डिजिटल क्रांतीकडे नेण्यासाठी नेतृत्व करणारे ठाण्याचे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे भारताचे मार्क झुकेरबर्गच आहेत, असे मत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी या ॲपचे लोकार्पण होत आहे, हे विशेष असल्याचे ते म्हणाले.

डिजिसिटीच्या रूपाने जगातील असलेले सर्वोत्तम आणि अद्ययावत तंत्रज्ञान जनतेला उपलब्ध करून देत आम्ही जगासमोर उत्तम उदाहरण ठेवले आहे, असे मत संजीव जयस्वाल यांनी या सोहळ्यात व्यक्त केले. या ॲपच्या माध्यमातून ठाण्यातील नागरिकांना विविध मूल्यवर्धित सेवा लाभ; तसेच विविध सवलती मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनमान उंचावण्यासही मदत मिळणार आहे. या ॲपच्या माध्यमातून ठाणे पालिकेला विविध योजना-प्रकल्पांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोचवणे शक्‍य होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या संकल्पनेला चालना देणाऱ्या या प्रकल्पामुळे पालिकेचा कारभार पारदर्शी होण्यासही मदत मिळणार आहे.

डिजिठाणे अॅप डाऊनलोड करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.gst.digithane

साभरात एक हजार यूजर
‘डिजिठाणे ॲप’ची सुरवात झाल्यानंतर अवघ्या एका तासात तब्बल एक हजार ठाणेकरांनी हे ॲप डाउनलोड केल्याची माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कार्यक्रमात दिली. याचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले.

महापालिकेच्या ‘डिजिसिटी’ कार्ड असणाऱ्या ग्राहकांना शहरातील विविध मॉल; तसेच एमसीएचआयने फ्लॅट खरेदीतदेखील ०.५ टक्के सवलत दिली आहे. याशिवाय शहरातील हॉटेल असोसिएशनने देखील पाच टक्के सूट देण्याची ग्वाही या वेळी दिली. या ॲपमध्ये आतापर्यंत दोनशे विविध मोठी दुकाने आणि मॉल यांनी नोंदणी केल्याची असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली.

डिजिठाणे अॅप डाऊनलोड करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.gst.digithan

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com