गटारीच्या रात्री ११४ मद्यपी चालकांवर ठाण्यात कारवाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

ठाणे - मद्य प्राशन करून वाहने चालवल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी उच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्गावरील मद्यविक्रीला वचक बसवला असली तरीही गटारीच्या काळात मद्य पिऊन वाहने चालवणाऱ्यांची संख्या कायम असल्याचे दिसून येत आहे. गटारीच्या पूर्वसंध्येला ठाणे वाहतूक शाखेच्या पोलिस बंदोबस्तात ११४ मद्यपी चालक सापडले.  त्यांच्याकडून अंदाजे अडीच लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती ठाणे वाहतूक शाखेने दिली. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि भिवंडी या भागात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.  

गटारीच्या निमित्ताने मद्याच्या आणि मांसाहाराच्या पार्ट्या झोडून त्याच अवस्थेत वाहन चालवत घरी जाणाऱ्या नागरिकांचा अपघात होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन अशांविरोधात ठाणे पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारला होता. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या परिसरातील १८ युनिटमधील प्रत्येक युनिटमध्ये दोन याप्रमाणे ३६ ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. या वेळी मद्य पिऊन येणाऱ्यांची तपासणी करण्यात येत होती. गटारीच्या एक दिवस आधीपासून सुरू झालेल्या या कारवाईत ११४ जणांवर कारवाई करण्यात आली. यात मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्याला अडीच हजारांचा दंड करण्यात आला. लायसन्स नसलेल्या मद्यपीला दोन हजार, तर मद्य पिणाऱ्याच्या वाहनावर मागे बसणाऱ्यांना दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

Web Title: thane news drinker driver