धनगर आरक्षणासाठी पुढाकार घेणार - शिंदे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

ठाणे - मागील अनेक वर्षांपासून मी सातत्याने आमदार म्हणून निवडून येताना माझ्या विजयात धनगर समाजाचा खूप मोठा वाटा आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून धनगर समाजाच्या हिताचा निर्णय घेण्यास मदत करीन, असे आश्‍वासन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (ता.३१) दिले. 

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ या संस्थांतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या धनगर समाजातील व्यक्तींना ‘धनगररत्न’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या वेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. 

३१ मे रोजी होणारी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेतर्फे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. बुधवारीही ठाण्यातील मासुंदा तलाव, जांभळी नाका येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. 

या वेळी यशवंत सेना सरसेनापती माधवभाऊ गडदे (राजकीय), महादेव सुळे (शैक्षणिक), तुषार धायगुडे (क्रीडा), उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ (राज्य पातळीवर सामाजिक कार्य), दादा कर्णवर (साहित्य), विनीत जांगळे (पत्रकारिता), ठाणे महापालिका उपायुक्त संजय हेरवाडे (शासकीय) यांना उल्लेखनीय कार्याबद्दल ‘धनगररत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच २५ ते ३० वर्षे समाजासाठी कार्य करणाऱ्या ज्येष्ठांचा सन्मानही करण्यात आला.

Web Title: thane news eknath shinde dhangar reservation