आता सातबारासाठी तलाठ्यांकडे जाण्याची आवश्यकता नाही: एकनाथ शिंदे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

आता या मशीन मुळे राज्यातील ऑनलाईन नेटवर्कमधील कुठलाही सात बारा काढणे शक्य होणार असून तलाठ्यांच्या कडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. जिल्ह्यात एकंदर ४४ ठिकाणी हि मशीन्स बसविण्यास सुरुवात होणार आहे.

ठाणे : डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमात पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १०१ गावांचे सात बारा संगणकीकरण पूर्ण झाल्याची माहिती आज जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. पालकमंत्र्यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यावर बसविण्यात आलेल्या ऑनलाईन सातबारा किऑस्क मशीनचा शुभारंभ करण्यात आला.

जिल्ह्यातील १००१ गावांपैकी पहिल्या टप्प्यात १०१ गावे पूर्ण झाली असून सातबारा संगणकीकरणात उल्हासनगर तालुका आघाडीवर आहे. या १०१ गावांत सात बाराचे किऑस्क मशीन डिजिटल स्वाक्षरीसह नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत असून सीएसआरच्या माध्यमातून आजपासून सर्व उपविभागीय अधिकारी,तहसील कार्यालयांमध्ये ही मशीन्स बसविण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.

आता या मशीन मुळे राज्यातील ऑनलाईन नेटवर्कमधील कुठलाही सात बारा काढणे शक्य होणार असून तलाठ्यांच्या कडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. जिल्ह्यात एकंदर ४४ ठिकाणी हि मशीन्स बसविण्यास सुरुवात होणार आहे. आजच्या शुभारंभ प्रसंगी आमदार संजय केळकर, आमदार रवींद्र फाटक तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते   

Web Title: Thane News Eknath Shinde talks about online 7/12