मोकळ्या भूखंडांवर अतिक्रमण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

ठाणे - ठाणे शहरात वनजमिनीवर आणि एमआयडीसीच्या जागेवर बहुतांश ठिकाणी अतिक्रमणे करून बेकायदा झोपडपट्ट्या वसवण्यात आल्या आहेत. यावर कुणाचाही अंकुश नसल्याने उर्वरित मोकळ्या भूखंडावरही राजरोस अतिक्रमण सुरू आहे.

वागळे इस्टेट रोड क्रमांक ३४ हनुमाननगर परिसरात एमआयडीसी आणि वनविभागाच्या मोकळ्या भूखंडांवर झोपडीमाफियांनी झोपडपट्टी आणि व्यावसायिक गाळे उभारून भाड्याने दिल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, भूमाफियांनी पालिकेच्या पाण्याच्या टाकीसाठी आरक्षित जागेवरही अतिक्रमण केले असून, या बेकायदा बांधकामांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. 

पालिकेच्या रायलादेवी प्रभाग समिती क्षेत्रातील वागळे इस्टेट रोड क्रमांक ३४ हनुमाननगर, अवघड बाबा परिसरातील सर्व्हे क्रमांक ५२० हा एमआयडीसीच्या मालकीचा, तर सर्व्हे क्रमांक ५२१ हा वनविभागाच्या अखत्यारीत आहे. येथील शेकडो एकर मोकळ्या जागांवर झोपड्या आणि व्यावसायिक गाळे उभारले जात आहेत. भूमाफियांकडून ही बांधकामे भाड्याने देऊन बक्कळ कमाई सुरू आहे. राजकीय वरदहस्त असल्याने भूमाफिया झोपडपट्टी उभारत आहेत. एमआयडीसी आणि वनविभागाच्या जागांवर ठाण्यातील सर्वांत मोठे अतिक्रमण या ठिकाणी सुरू असल्याचा आरोप स्थानिक भाजप नगरसेवक विलास कांबळे यांनी केला आहे. 

वागळे इस्टेट परिसरातील अतिक्रमणाबाबतच्या तक्रारीचे दखल घेतली असून, पालिकेच्या अतिक्रमण पथकाने पाहणीसुध्दा केली आहे. येथील बांधकामाला कुठलेही अभय दिलेले नाही. या जागेच्या मालकीबाबत पडताळणी सुरू असून कार्यवाही प्रस्तावित आहे.
- अनुराधा बाबर, सहायक आयुक्त, रायलादेवी प्रभाग समिती

Web Title: thane news Encroachment on free plots