ठाण्यात हॉटेलवर बुलडोझर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

ठाणे - मानपाडा येथील कोठारी कम्पाऊंडमधील हुक्का पार्लर आणि लाऊंजवरून महापालिका प्रशासनाला नगरसेवकांकडून वारंवार लक्ष्य केले जात होते; पण सोमवारी (ता.२२) या विषयावर आक्रमक होऊन प्रशासनाने कोठारी कम्पाऊंडमधील अग्निशमन दलाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र नसलेले हुक्का पार्लर, लाऊंज बार आणि हॉटेल अशी सहा ठिकाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत सील केली. ठाण्यातील सुमारे १० बेकायदा हॉटेल्सवर बुलडोझर चालविण्याची कारवाई आज महापालिकेने केली.

अतिक्रमण विरोधी विभागाचे उपायुक्त अशोक बुलपुल्ले यांच्या पथकाने ही कारवाई केली. शनिवारी झालेल्या सभेत प्रश्‍नोत्तराच्या तासाला भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी कोठारी कम्पाऊंडचा मुद्दा उपस्थित केला होता. कारवाईचा देखावा करून अभिनंदनाची थाप मिळविल्याची टीका त्यांनी केली होती. त्या वेळी शहरातील सर्व आस्थापनांना सप्टेंबर महिन्यात ९० दिवसांच्या आत कागदपत्रे सादर करण्याची नोटीस बजावली होती. ती मुदत २८ डिसेंबरला संपली, त्यानंतर कारवाई करण्यास घेतली असता, हॉटेल मालकांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार त्यांना २० जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त बुरपुल्ले यांनी या वेळी  दिली होती.

नौपाडा प्रभाग समितीमधील ‘पुरेपूर कोल्हापूर’ या हॉटेलमधील बेकायदा बांधकाम तोडण्यात आले. 

विशेष म्हणजे कोठारी कम्पाऊंडमधील बेकायदा बांधकामावर टीका करणाऱ्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्या पतीचे ‘पुरेपूर कोल्हापूर’ हे हॉटेल असल्याचे कळते. या हॉटेलसह तलावपाळी येथील प्रसिद्ध ‘साईकृपा’ या हॉटेलच्या ठिकाणी करण्यात आलेले वाढीव बांधकाम तोडून टाकण्यात आले; तर रेल्वेस्थानकाजवळील सहाव्या मजल्यावरील ‘एक्‍स्पीरियन्स’ हा टेरेस बार पूर्णत: तोडून टाकण्यात आला. त्याचबरोबर मल्हार सिनेमा येथील दुर्गा बार आणि रेस्टॉरंट; तसेच जांभळी नाका येथील अरुण पॅलेस बार अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्याने सील करण्यात आले. तसेच रामचंद्रनगर येथील ‘जयेश’ हा लेडीज बार पूर्णत: जमीनदोस्त करण्यात आला; तर उथळसर येथील ‘फुकरे’ बारसह इतर तीन रेस्टॉरंटसवर कारवाई झाली.

पोलिस बंदोबस्तात कारवाई
कोठारी कम्पाऊंडमधील हॉटेल, पब लाऊन्स, बार आणि शहरातील ४५८ हॉटेल आस्थापनांवर सोमवारपासून कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महापालिकेने पोलिस बंदोबस्तात आज सकाळी दहा वाजता या कारवाईस सुरुवात केली. यामध्ये अग्निशमन विभागाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र नसल्याने कोठारी कम्पाऊंडमधील ‘एमएच झिरो फोर पब आणि बार’, ‘डान्सिंग बॉटल पब’, ‘लाऊंज १८ बार’, ‘व्हेअर वुई मेट’, ‘बार इन्डेक्‍स’ हे हुक्का पार्लर जसील करतानाच या ठिकाणी करण्यात आलेले वाढीव बांधकाम तोडून टाकले.

Web Title: thane news encroachment hotel