कोसळलेल्या इमारतप्रकरणी चौघे बिल्डर निर्दोष

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

ठाणे - मुंब्रा येथे ऑगस्ट 2013 मध्ये बानो इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी एकाच कुटुंबातील चार बांधकाम व्यावसायिकांची न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

ठाणे - मुंब्रा येथे ऑगस्ट 2013 मध्ये बानो इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी एकाच कुटुंबातील चार बांधकाम व्यावसायिकांची न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

जीवनबाग येथील बानो ही तीन मजली इमारत कोसळून चार रहिवाशांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक अकिल शेख, बानो शेख यांच्याबरोबरच त्यांची दोन मुले शकील शेख आणि मुबीन शेख यांना अटक केली होती. अनधिकृत इमारत उभारून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने केला होता; मात्र गुन्हे अन्वेषण विभाग व सरकारी वकिलांनी न्यायालयात सादर केलेले साक्षीपुरावे ग्राह्य धरण्यात आले नाहीत. त्यामुळे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एम. पटवर्धन यांनी सबळ पुराव्यांअभावी चौघांची निर्दोष मुक्तता केली.

Web Title: thane news Four Builder Innovations for building colpase