गणेशोत्सवासाठी ऑनलाईन परवानगी!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

ठाणे - यंदा गणेशोत्सवासाठी पोलिसांच्या परवानगीचा अर्ज ऑनलाईन देण्यात आल्याने गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची पोलिस ठाण्यातील वारी टळणार आहे. यासाठी ठाणे आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर एक लिंक देण्यात आली आहे. हा उपक्रम आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या सर्व पोलिस ठाण्यांत राबवला जाणार आहे. ठाणे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी शुक्रवारी (ता. ११) या उपक्रमाबाबत माहिती दिली. सध्या आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलिस ठाण्यात एक खिडकी योजनेंतर्गत परवानगीची व्यवस्था करण्यात आली आहे.

गणेशोत्सव काळात मंडळांची गणपतीच्या स्वागताची तयारी सुरू असते. त्यातच महापालिका आणि पोलिस प्रशासनाची परवानगी घ्यावी लागत असल्याने कागदपत्रे जमा करताना त्यांची मोठी तारांबळ उडते. मंडपासाठी जागामालकांची परवानगी, महापालिकेची परवानगी, विजेसाठी महावितरणकडे अर्ज करणे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याबद्दल पोलिसांची ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. सरकारी कार्यालयांत जाऊन या सर्वांसाठी पाठपुरावा करावा लागत असल्यामुळे कार्यकर्त्यांवर ताण येतो. परवानगीसाठी पोलिस ठाण्यातही गर्दी होत असल्याने पोलिस यंत्रणेवरही त्याचा अधिक भार येतो. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी गणेशोत्सव काळासाठी एक खिडकी योजना सुरू केली होती. आता त्यापुढे जाऊन यंदा ऑनलाईन परवानगीचा पर्याय पोलिसांनी खुला केला आहे.

थेट मंडपातून परवानगी
ठाणे पोलिसांच्या या उपक्रमाची अधिकृत घोषणा झाली आहे. २५ ऑगस्टला गणेशचतुर्थी आहे. त्यामुळे पुढील आठ दिवसांत या योजनेला सुरुवात होईल. या उपक्रमामुळे मंडळातील तरुणांना गणेश मंडळाच्या मंडपातूनच उत्सवाची परवानगी घेणे शक्‍य होणार आहे, असा दावा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केला आहे.

Web Title: thane news ganeshotsav