ठाण्याचा कचरा खारफुटीच्या मुळावर 

श्रीकांत सावंत
शुक्रवार, 23 जून 2017

ठाणे - शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिका प्रशासनाकडे स्वत:ची क्षेपणभूमी नसल्यामुळे दिव्यातील खारफुटीवर कचरा टाकून पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे. विशेष म्हणजे या कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खारफुटी नष्ट होत आहे. एकीकडे खारफुटीतोड रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जात असताना दिव्यात मात्र ती नष्ट करण्यास पालिका पुढे असल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे. दिव्यातल्या खासगी जागेवर पालिका कचरा टाकत असली, तरी ही जागा खारफुटी आणि पाणथळ असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.

ठाणे - शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिका प्रशासनाकडे स्वत:ची क्षेपणभूमी नसल्यामुळे दिव्यातील खारफुटीवर कचरा टाकून पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे. विशेष म्हणजे या कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खारफुटी नष्ट होत आहे. एकीकडे खारफुटीतोड रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जात असताना दिव्यात मात्र ती नष्ट करण्यास पालिका पुढे असल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे. दिव्यातल्या खासगी जागेवर पालिका कचरा टाकत असली, तरी ही जागा खारफुटी आणि पाणथळ असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. येथील पक्षी अधिवास मोठा असून कचऱ्यामुळे त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. 

शहरातील कचरा टाकण्यासाठी डायघर भागातील 19 हेक्‍टर जागा सरकारकडून पालिकेला मिळाली; परंतु येथील नागरिकांच्या विरोधामुळे तिथे क्षेपणभूमीची सुरू झाली नाही. त्यानंतर दिव्याजवळील खर्डी परिसरातल्या 15 एकर जागेवर कचरा टाकला जात आहे. विशेष म्हणजे हा भूभाग खारफुटीने व्यापला असूनही पालिकेने यावर कचरा टाकून परिसर पूर्णतः बुजवून टाकला आहे. दररोज 200 मेट्रिक टनाहून अधिक कचरा या भागात टाकला जात आहे. क्षेपणभूमीवरून नागरिकांनी अनेक वेळा आंदोलन केले; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याप्रकरणी पालिकेचे घनकचरा विभागाचे उपायुक्त संजय हेरवाडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

खारफुटीवर दररोज 50 ते 60 ट्रक कचरा टाकला जातो. उन्हाळ्यात आग लागल्यामुळे अनेक ठिकाणी खारफुटी काळवंडली. कचऱ्याखाली शेकडो खारफुटी गुदमरल्या आहेत. दररोजच्या कचऱ्यामुळे हे क्षेत्र विस्तारत आहे. या प्रकरणी सगळ्याच राजकीय पक्षांनी आंदोलने केली, तरी हे नष्टचर्य सुरूच आहे. त्यामुळे हा प्रकार मुख्यमंत्र्यांसमोर नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. 
-रोहिदास मुंडे, सरचिटणीस, दिवा-शिळ मंडळ, भाजप 

नागरिकांनी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली, तर क्षेपणभूमीवरील कचऱ्याचे प्रमाण कमी होईल. त्यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था यांच्याइतकिीच सामान्य नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे. खारफुटीकडून थेट फायदा होत नसल्यामुळे त्यांना दुर्लक्षित केले जाते. त्यांचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहचवण्याची गरज आहे. 
-अविनाश भगत, पर्यावरण अभ्यासक 

Web Title: thane news garbage