लाखभराच्या फोनसाठी तरुणीने गमावले दोन लाख

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

ठाणे - ऑनलाइन खरेदीत खबरदारी घ्या; अन्यथा सवलतीच्या नादात पैसे गमावण्याची वेळ येईल. ठाण्यातील 25 वर्षांच्या तरुणीला याचा नुकताच अनुभव आला आहे. लाखभराचा "आयफोन एक्‍स' फोन अर्ध्या किमतीत ऑनलाइन खरेदी करण्यासाठी तिने एक लाख 90 हजार रुपये गमावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणीने क्‍लोनी नामक व्यक्तीविरोधात दिलेल्या तक्रारीवरून श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वागळे इस्टेट परिसरात किसननगर भागात ही तरुणी राहते. तिला महागडे फोन वापरण्याची हौस आहे. तिच्याकडे सॅमसंग आणि आयफोन 7 हे फोन असताना बाजारात नव्यानेच आलेल्या "आयफोन एक्‍स' महागड्या फोनची भुरळ पडली. या फोनची किंमत लाखाच्या घरात असल्याने हा फोन घेणे तिला शक्‍य होत नव्हते. 24 फेब्रुवारीला तिला फेसबुक खात्यावर "मुंबई होलसेल बाजार' ही जाहिरात नजरेस पडली. या जाहिरातीत या फोनची किंमत केवळ 45 हजार रुपये होती. हा महागडा फोन घेण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी तिने दुसऱ्याच दिवशी या जाहिरातीनुसार आयफोन एक्‍सची ऑनलाइन ऑर्डर दिली होती.
Web Title: thane news iphone x cheating crime