नियम धाब्यावर... विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात....

रविंद्र खरात
शुक्रवार, 16 जून 2017

कल्याण: शाळकरी विद्यार्थी वर्गाची सुरक्षित प्रवास करण्याबाबत राज्य शासनाने 2011 मध्ये धोरण जाहिर केले होते. शाळा सुरु झाल्या असून विद्यार्थी वर्गाची वाहतूक करण्याऱ्या वाहन चालक नियम बाह्य वाहतूक करत असल्याने कल्याण डोंबिवली शहरात विद्यार्थी वर्गाचा जीव धोक्यात आला असून मोठी दुर्घटना झाल्यावर सरकारी यंत्रणा जागी होणार काय असा सवाल केला जात आहे.

कल्याण: शाळकरी विद्यार्थी वर्गाची सुरक्षित प्रवास करण्याबाबत राज्य शासनाने 2011 मध्ये धोरण जाहिर केले होते. शाळा सुरु झाल्या असून विद्यार्थी वर्गाची वाहतूक करण्याऱ्या वाहन चालक नियम बाह्य वाहतूक करत असल्याने कल्याण डोंबिवली शहरात विद्यार्थी वर्गाचा जीव धोक्यात आला असून मोठी दुर्घटना झाल्यावर सरकारी यंत्रणा जागी होणार काय असा सवाल केला जात आहे.

शाळकरी विद्यार्थी वर्गाचा सुरक्षित प्रवास करावे याबाबत मुंबई उच्च न्यायालयने आदेश दिल्यानंतर राज्य शासनाने 2011 मध्ये स्कूल बस धोरण जाहिर केले होते, त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन, वाहतूक पोलिस, आरटीओ आणि पालक संघटनावर आहे, विद्यार्थी वाहतुक करणारे वाहन आहे त्याची परवानगी आरटीओ कार्यालय मार्फ़त घ्यावी लागते, आरटीओ ने परमिशन दिलेली आहे त्या पेक्षा जास्त विद्यार्थी वर्गाला रिक्षा, टैक्सी, बस मध्ये कोंबुन नेताना कल्याण डोंबिवली मध्ये दिसत आहेत. कल्याण आरटीओ अंतर्गत डोंबिवली, ठाकुर्ली कल्याण टिटवाला शहाड उल्हासनगर अंबरनाथ बदलापुर आणि मुरबाड़ शहराचा समावेश होतो . कल्याण आरटीओ मध्ये 821स्कूल  वाहनाची नोंद करण्यात आली असून त्यात 439 वाहन शाळेच्या मालकीची आहे . बुधवार ता 15 पासून शाळा सुरु झाल्या असून कल्याण पूर्व सहित कल्याण पश्चिम, डोंबिवली, अन्य शहरात शाळकरी विद्यार्थी वर्गाची वाहतुक करणारे वाहन चालक मुलाना रिक्षा, बस, टैक्सी, जीप मध्ये कोंबुन वाहतुक करताना दिसत आहे यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आली आहे.

नियमावली
वाहनाची फिटनेस बाबत आरटीओ कार्यालय मध्ये नोंद करावी. वाहनावर स्कूल बस अथवा वाहन लिहावे, सुरक्षेचा उपाय म्हणून प्रत्येक वाहनात प्रथमोचार साहित्य ठेवावे, प्रत्येक वाहनात महिला अथवा पुरुष सहकारी ठेवावे, शाळेत समिती गठित करावी, आरटीओने ज्या वाहनाला प्रवासी वाहतुक करणाऱ्या बाबत जेवढी परवानगी दिली तेवढे विद्यार्थी घ्यावेत ,फायर किट तर विद्यार्थी संख्या जास्त असेल तर तेवढ़या खासगी वाहनाची व्यवस्था करावी, वाहनात आपातकालीन खिड़की असावी, जे नियम आहेत ते धाब्यावर बसवून वाहन चालक विद्यार्थी वर्गाची वाहतुक केली जात असून मोठी दुर्घटना घडल्यावर सरकारी यंत्रणा जागी होणार का असा सवाल केला जात आहे.

प्रतिक्रिया
कालच शाळा सुरु झाली आहे, पालकांनी आपल्या पालकाच्या सुरक्षेबाबत पुढाकार घेतला पाहिजे, विद्यार्थी संख्या जास्त असेल तर मुख्याध्यापक वर्गाने वाहनाची संख्या वाढवा अश्या सूचना दिल्या आहेत, याबाबत एक पथकाची नेमणुक केली असून कारवाई सुरु झाली असून नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांची हयगय केली जाणार नाही, अशी माहिती कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाने यांनी दिली.

■ ई सकाळवरील महत्वाच्या बातम्या

"भारत-सिंगापूर' मैत्रीमुळे चीन अस्वस्थ!
पवार 'समृद्धी' प्रकल्पाच्या विरोधात कसे?
#स्पर्धापरीक्षा - भारत-अमेरिका संरक्षण करार
'मुदतपूर्व'च्या फुक्‍या जोर-बैठका
पतधोरणाची पावले योग्य दिशेने
रविवारी भारत - पाकचा लंडनला डबल धमाका
भाजपचे अध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल
कराल "नायगरा'ने गिळले विक्रमवीरास..
पुरूष नाटकामागे घडलेले नाट्य प्रथमच रंगमंचावर
लंडन : अग्नितांडवात किमान 65 मृत्युमुखी?
'SCO'त मतभेदांना स्थान नाही
ध्वनिक्षेपकावरून एकाच वेळी 'अजान'
लोकवर्गणीतून 7 कि.मी.पर्यंत नदीचे खोलीकरण व रुंदीकरण

Web Title: thane news kalyan city school bus and student