रेल्वे प्रवाश्यांची रोज मरे त्याला कोण रडे अशी गत...

रविंद्र खरात
शुक्रवार, 30 जून 2017

कल्याण: मुंबई च्या दिशेने जाणारी हज़रात निजामुद्दीन ते एर्नाकुलम मंगला एक्प्रेसचे इंजिन आज (शुक्रवार) दुपारी 2 वाजुन 20 मिनिटच्या सुमारास कल्याण रेल्वे स्टेशन पासून अवघे 500 मीटर अंतरावर रुळावरुन घसरले यामुळे कल्याण कसारा मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली. सुदेवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी घसरलेले इंजिन तब्बल दोन तासाने बाहेर काढण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. 4 वाजुन 17 मिनिटला ती मेल कल्याण रेल्वे स्थानकात सोडण्यात आली. यामुळे कल्याण पुढील प्रवासी वर्गाची रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था झाली होती.

कल्याण: मुंबई च्या दिशेने जाणारी हज़रात निजामुद्दीन ते एर्नाकुलम मंगला एक्प्रेसचे इंजिन आज (शुक्रवार) दुपारी 2 वाजुन 20 मिनिटच्या सुमारास कल्याण रेल्वे स्टेशन पासून अवघे 500 मीटर अंतरावर रुळावरुन घसरले यामुळे कल्याण कसारा मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली. सुदेवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी घसरलेले इंजिन तब्बल दोन तासाने बाहेर काढण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. 4 वाजुन 17 मिनिटला ती मेल कल्याण रेल्वे स्थानकात सोडण्यात आली. यामुळे कल्याण पुढील प्रवासी वर्गाची रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था झाली होती.

रेल्वे प्रशासन कडून मिळालेल्या माहिती नुसार, मुंबईकडे येणाऱ्या हजरत निजामुद्दीन एरनाकुलम मंगला एक्सप्रेस ही सकाळी 8 वाजुन 55 मिनिट ला कल्याण रेल्वे स्थानकात येते मात्र आज शुक्रवार ता 30 जून रोजी 5 तास उशिरा धावत दुपारी वाजुन वीस मिनिटला कल्याण च्या दिशेने येत असताना कल्याण रेल्वे स्थानकाच्या 500 मीटर अंतरावर त्या मेल गाडीचे इंजिन रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची कल्याण कसारा दरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती, मुंबईकडे येणारी मंगला एक्स्प्रेस कल्याण स्थानकाकडे येत होती. त्यावेळी रेल्वे ट्रॅक बदलत असताना या एक्स्प्रेसच्या इंजिनाचे चाक रुळावरून उतरले. सुदैवाने ट्रॅक बदलत असल्याने गाडीचा वेग अत्यंत कमी होता. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने घसरलेले इंजिन रुळावर आणण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू होते. या घटनेनंतर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.तब्बल 2 तासाने इंजिन बाहेर काढण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले, 4 वाजुन 17 मिनिट ला ती मेल कल्याण रेल्वे स्थानक कड़े रवाना झाली तदनन्तर ही घटना का झाली याची चौकशी करण्यासाठी रेल्वे चे तांत्रिक विभाग अधिकारी वर्ग घटना स्थळी धाव घेतली यामुळे शहाड वरुन 4 वाजुन 45 मिनिट पासुन कल्याण च्या दिशेने रेल्वे वाहतुक संथ गतीने सुरुवात झाली.

तांत्रिक विभाग अधिकारी मध्ये मतभेद...
घटना झाल्यावर दुर्घटना मागचे कारण काय आहे हे पाहणी करण्यासाठी अधिकारी वर्ग आले असता तांत्रिक अधिकारी वर्गाचे मतभेद समोर आले, घटना का घडली याचे कारण शोधत असताना स्थानिक अधिकारी अडथळा आणत असल्याचा समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे.

उच्च स्तरीय चौकशीचे आदेश...
कल्याण रेल्वे स्थानक कड़े येताना मेल गाडीचा वेग कमी होता, रूळ बदलत असताना इंजिन का घसरले याची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर नेमकी काय कारण आहे स्पष्ट होईल आणि त्यावर मी बोलू शकतो अशी प्रतिक्रिया मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक रविंद्र गोयल यांनी दिली.

रेल्वे लाइन गैंगमेन च्या हाती...
कल्याण ते कसारा दरम्यान राहणाऱ्या रेल्वे प्रवाश्यांनी काय गुन्हा केला हे समजत नाही मात्र प्रति दिन या मार्गावर या घटना घडत असून रेल्वे लाइन गैंग मेन च्या हाती असल्याचे आरोप कल्याण कसारा कर्जत प्रवासी संघटना सचिव श्याम उबाले यांनी केला आहे.

पावसाळ्यापूर्वीची काम कागदावर...
रेल्वे प्रशासनात सर्वञ सावळागोंधळ सुरू आहे.ऐन पावसाळा तोंडावर आला असतानाही नालेसफाईचे काम व जुन्या झालेल्या रेल्वे रूळांचे नियमित दुरूस्ती केली नव्हती.याआधी सविस्तर निवेदन कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनाने रेल्वे प्रशासनाला देऊनही काही प्रतिसाद मिळाला नाही याबाबत

'सकाळ'च्या माध्यमातून कल्याण स्थानकातील व कसारा कर्जत रेल्वे मार्गावरील अस्वच्छतेसह, रूळांची देखभाल, रूळांमधील घाण, मलमुञ रूळांवर सोडले जातेय अशा समस्यांचे फोटोसह बातमी प्रकाशित झाल्यावर त्या बातमीसह जीएम व रेल्वेमंञी यांना या तक्रारी पाठविल्या असता डिआरएम गोयल यांना धावती भेट घेऊन कल्याण स्थानक व रूळांची पाहणी केली व सफाईचे आदेश दिले माञ त्यातही व्यवस्थित कामे न झाल्याने हा प्रकार घडलाय व आता पावसाची सुरूवात असताना यांची तांञिक दुरूस्ती न केल्याने गेली आठवडाभर तांञिक बिघाड होऊन प्रवाशांना मनस्ताप होतोय असा संताप रेल्वे प्रवाशी संघटना करत आहे.

मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक रविंद्र गोयल यांनी स्वतः काही दिवसा पूर्वी कल्याण स्थानकाची पाहणी केली होती व सर्व रेल्वे रूळ व रूळांमधील ज्वाईंट - क्रासिंग बदलणार असून स्वतंञ लाईन करण्याचे घोषित केले होते व संबधीत रिपोर्ट दिल्ली बोर्डाकडे पाठविणार होते मात्र या घटनेने तरी याला चालना मिळेल का असा सवाल केला जात आहे.

रेल्वे सेवा विस्कळीत
कल्याण डोंबिवली आणि कल्याण शहाड आणि कल्याण विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक दरम्यान लोकल आणि मेल गाड्यांच्या रांगा लागल्याने अनेक प्रवाश्यांनी रुळावरुन चालत पुढील रेल्वे स्थानक गाँठत होते यावेळी सुरक्षा बलाचे जवान स्पीकर वरुन त्यांना सूचना देत होते तर कल्याण पुढील कर्जत आणि कसारा च्या दिशेने रेल्वे स्थानक मध्ये प्रवासी वर्गाची गर्दी झाली होती.

'ई सकाळ'वरील महत्वाच्या ताज्या बातम्या
बलात्काराचा आरोप करत जमावाने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू
नाशिकमध्ये व्हॉटसऍपचे हॅकिंग; दक्षतेचे आवाहन
सामान्यांच्या जेवणात दिसू लागले वरण
वारीद्वारे केली अपंगत्वावर मात
परभणी: पत्नीची पेटवून घेऊन तर पतीची गळफास घेऊन आत्महत्या
कल्याणमध्ये पावसामुळे रस्त्यावर खड्डे; वाहतुकीची कोंडी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी फरार
'बीफ' बाळगल्याच्या आरोपाखाली जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू
नाशिकमधील सोनसाळखीची चोरी सीसीटीव्हीत कैद (Video)
यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून एकाचा मृत्यू

Web Title: thane news kalyan railway