२७ गावांत पावसाळ्यातही पाणीटंचाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

कल्याण -  कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये दीड वर्षापूर्वी समाविष्ट होऊनही २७ गावांची तहान काही भागलेली नाही. उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा बसत असतानाच आता धो-धो पावसातही पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या दैनंदिन कामासाठी पावसाचे पाणी साठवून ठेवण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सोनारपाड्याच्या नागरिकांनी नुकतीच केडीएमसीचे उपमहापौर मोरेश्‍वर भोईर यांची भेट घेत आपले गाऱ्हाणे मांडले.

पाणी समस्या ही २७ गावांतील नागरिकांच्या पाचवीलाच पुजली आहे; मात्र सोनारपाडा परिसरातील नागरिकांना ऐन पावसाळ्याच्या दिवसातही पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. स्थानिक नगरसेविकेकडे वारंवार तक्रार करूनही उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, असा आरोप येथील नागरिकांनी या वेळी केला. तसेच या समस्येवर तोडगा काढण्याची विनंती भोईर यांना केली. याबाबत स्थानिक नगरसेविका दमयंती वझे यांच्याशी संपर्क साधला असता, घरगुती कार्यक्रमात वझे या व्यस्त असल्याचे उत्तर त्यांच्या पतीने दिले. 

‘टेंडर’मध्ये अडकले पाणी?
या प्रकरणाची गंभीर दखल घेत भोईर यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांना विचारणा केली असता, सोनारपाडा परिसरात एक पाईपलाईन टाकण्याचे काम प्रलंबित आहे. या कामासाठी दोन कंपन्यांच्या निविदा आल्या असून, त्या प्रक्रियेमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यातील एक कंत्राट घेणारी कंपनी वादग्रस्त असल्यामुळे भोईर यांनी या कंपनीला संबंधित काम देऊ नये, अशी विनंती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी केली.

Web Title: thane news KDMC water rain