केडीएमटीचे महाव्यवस्थापक भाजपच्या रडारवर!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

कल्याण -  कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणाऱ्या रेल्वे समांतर रस्त्यावर केडीएमटीच्या नव्याने सुरू झालेल्या बस सेवेच्या वेळापत्रकाचा मंगळवारी बोजवारा उडाल्याने केडीएमटीच्या महाव्यवस्थापकांची हकालपट्टी करा, अशी मागणी भाजपचे नगरसेवक आयुक्तांकडे करणार असल्याची माहिती कल्याण-डोंबिवली महापालिकेचे भाजपचे गटनेते वरुण पाटील यांनी ‘सकाळ’ला दिली.

भाजपचे नगरसेवक मंगळवारी बस सेवेच्या स्वागतासाठी खंबाळपाडा परिसरात उभे होते; मात्र बस तब्बल दोन तास उशिरा आल्याने मंगळवारी दुपारी भाजप गटनेत्यांच्या दालनात झालेल्या नगरसेवकांच्या सभेत नगरसेवक नीलेश म्हात्रे, साई शेलार, राजन आभाळे, विनोद काळण यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत गटनेते वरुण पाटील यांच्याकडे संबंधित विषय मांडला होता. 

बस ब्रेकडाऊन झाल्यामुळे वेळापत्रक कोलमडले. संबंधित घटनेची चौकशी करण्यात येईल. लवकरच खंबाळपाडा बस डेपो सुरू झाल्यावर तेथून अधिक बस या मार्गावर सोडणे शक्‍य होईल. 
- देविदास टेकाळे, परिवहन महाव्यवस्थापक

केडीएमटीची नवीन बस सेवा लवकरच सुरळीत होईल. नवीन मार्गावर बस थांबे उभारण्यात येणार असून, सध्या नागरिकांनी बसला हात दाखविल्यास बस थांबवण्याच्या सूचना देण्यात येतील.
- संजय पावशे, परिवहन समिती सभापती

परिवहन महाव्यवस्थापक बैठकीत व्यस्त होते; अन्यथा त्यांना जाब विचारायला जाण्याचे भाजप नगरसेवकांनी ठरवले होते.
- वरुण पाटील, गटनेते, भाजप

Web Title: thane news KDMT BJP