बस बंद पडल्याने प्रवाशांना मनस्ताप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

कल्याण - कल्याण-हाजी मलंग या मार्गावर धावणारी केडीएमटी बस चार दिवसांनंतर सोमवारी (ता. २६) सुरू झाली. दुपारी दीड वाजता ही बस कल्याण एसटी स्थानकातून बाहेर पडली; पण स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच ती बंद पडली. या बसमुळे प्रवेशद्वारच अडवले गेल्याने केडीएमटीसह एसटी बसही अडकून पडल्या होत्या. 

ही बस प्रवेशद्वारातून बाजूला करण्यात अर्धा-पाऊण तास गेला. त्यामुळे एसटी स्थानकासमोर वाहनांची मोठी रांग लागली होती. या वेळेत प्रवाशांचे मोठे हाल झाले. नेवाळी परिसरात गुरुवारी (ता. २२) शेतकऱ्यांचे आंदोलन पेटले होते. आंदोलनकर्त्यांनी वाहनांना लक्ष्य केल्याने केडीएमटीने या मार्गावरील बस बंद केल्या होत्या. सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून कल्याण-हाजी मलंग मार्गावर बस पुन्हा सुरू झाल्या. त्यामुळे प्रवाशांनी स्थानकात मोठी गर्दी केली होती. 

पावसाळ्यात बस बंद पडण्यामागची कारणे अनेक आहेत. या समस्येवर भविष्यात नियंत्रण मिळवले जाईल. बस बंद पडल्यावर काही वेळात दुसरी बस सोडण्यात आली.
देवीदास टेकाळे, महाव्यवस्थापक, केडीएमटी 

Web Title: thane news KDMT bus