माळशेज घाटावर पारदर्शक स्कायवॉक

माळशेज घाटावर पारदर्शक स्कायवॉक

ठाणे - निसर्गरम्य माळशेज घाटाचे सौंदर्य आणखी वाढणार आहे. या ठिकाणी बाराही महिने असलेला पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी जागतिक दर्जाचा स्कायवॉक (व्ह्यूइंग गॅलरी) बांधला जाणार आहे. 

पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार किसन कथोरे यांनी माळशेज घाटात अधिक पर्यटक यावेत; तसेच त्याचे महत्त्व वाढावे, अशी सूचना केली होती. त्याचाच एक भाग म्हणून हा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. प्रकल्पातील कामांच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे ५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडे मान्यतेसाठी सादर केला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

माळशेज घाट सुप्रसिद्ध असून उंच डोंगर, टेकडी; तसेच विविध धबधब्यांनी नटलेला असा हा परिसर आहे. हा पश्‍चिम घाट म्हणून जागतिक वारसा यादीत आहे. येथे दुर्मिळ पशु-पक्षी आढळून येतात. घाटात वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. जिल्हा प्रशासनाने प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत घाटात विविध ठिकाणी पार्किंग आणि व्ह्यू पॉईंटस तयार केले आहेत. येथील पर्यटकांचा घाटात येण्याचा ओढा बघता या सुविधा कमी पडतात म्हणून पालकमंत्र्यांनी घाटातील महाराष्ट्र पर्यटन निवासाशेजारील टेकडीवर जागतिक दर्जाचा स्कायवॉक बांधण्याची सूचना केली होती. त्याला अनुसरून जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांच्या माध्यमातून या जागेत काचेचा पारदर्शक स्कॉयवॉक बांधण्यासाठी इमारत बांधणे आणि पर्यटकांच्या दृष्टीने सौंदर्यीकरण आणि बागकाम करणे, या कामांच्या पहिल्या टप्प्यातील सुमारे पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांना मान्यतेसाठी सादर केला आहे. 

माळशेज घाटाचे सौंदर्य खुलवण्यासाठी बांधण्यात येणारा स्कायवॉक म्हणजे देशातील पहिलीच व्ह्यूइंग गॅलरी असेल आणि यामुळे घाटाच्या निसर्गसौंदर्यात निश्‍चित वाढ होऊन पर्यटकांची संख्या वाढेल.
- अमोल खंडारे, जिल्हा नियोजन अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com