ठाणे: तानसा नदीला महापूर अक्‍लोली येथे कुंड पाण्याखाली

दीपक हिरे
रविवार, 25 जून 2017

वज्रेश्वरी (जि. ठाणे) - भिवंडी तालुक्‍यातील पर्यटनस्थळ म्हणून परिचित असलेल्या व गरम पाण्याचे कुंड म्हणून ओळखले जाणारे अक्‍लोली कुंड येथे तानसा नदीला महापूर आला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून गरम पाण्याची कुंड पाण्याखाली बुडाले आहे.

शनिवारी रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गणेशपुरी, वज्रेश्वरी, अक्‍लोली, अम्बाडी या परिसराला पावसाने पूर्ण झोडपले आहे. येथील नदी-नाले खाचखळगे तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे येथील तिन्ही गावाजवळून जाणाऱ्या तान्सा नदीस महापूर आला आहे या अतिवृष्टीतमुळे शेतकऱ्याने लावलेले भात बियाणे मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. तर नदी किनाऱ्यालगत अक्‍लोली कुंड या गावामध्ये गरम पाण्याची कुंड बुडली आहेत. काही घरामध्ये पुराचे पाणी शिरले आहे. या भागात पावसाची संततधार सुरु आहे. आज पहाटेपासून या भागात जोरदार पाऊस असलयने काही नागरिकनि घरीच राहणे पसंद केले आहे. मुसळधार पावसामुळे येथील सरकारी दवाखान्या जवळ रस्ता वाहून गेल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तर रस्त्यातील खड्ड्यांमुळे वाहनांना अपघात होत आहेत. दरम्यान या पावसाचा फटका येथील वाडा जवळची गोराड निंबवली अवचित पाडा यांना देखील बसल्याने येथील जनजीवन विसकळीत झाले आहे. तर मेढा फाटा येथील पूल पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक ठप्प झाली आहे.

Web Title: thane news marathi news monsoon news monsoon