'एमडी' इंदोर कनेक्शन; अंमलीपदार्थाचा साठा हस्तगत

दीपक शेलार
शनिवार, 6 जानेवारी 2018

नाशिकच्या सोनसाखळी चोरासह इंदोरचे दोघे अटकेत

ठाणे: मेफेड्रॉन (एम.डी पावडर) या अंमलीपदार्थाचे इंदोर (मध्यप्रदेश) कनेक्शन ठाणे पोलिसांनी उघडकीस आणले आहे. नाशिकमधील रेकॉर्डवरील सोनसाखळी चोरासह इंदोरच्या दोघांना ठाणे पोलिसांना अटक केली असून त्यांच्याकडून 822 ग्रॅम एमडी पावडर जप्त केला आहे.

नाशिकच्या सोनसाखळी चोरासह इंदोरचे दोघे अटकेत

ठाणे: मेफेड्रॉन (एम.डी पावडर) या अंमलीपदार्थाचे इंदोर (मध्यप्रदेश) कनेक्शन ठाणे पोलिसांनी उघडकीस आणले आहे. नाशिकमधील रेकॉर्डवरील सोनसाखळी चोरासह इंदोरच्या दोघांना ठाणे पोलिसांना अटक केली असून त्यांच्याकडून 822 ग्रॅम एमडी पावडर जप्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थाची किंमत 16 लाख 44 हजार रुपये आहे. नाशिक गंजमाळ येथील अक्रम खान (30) याच्याविरोधात नाशिकात विविध प्रकारचे 18 गुन्हे दाखल असून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. कायदेशीर प्रक्रियेनंतर या आरोपींना नाशिक पोलिसांच्या हवाली केले जाणार आहे, अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत दिली.

नाशिक येथील अनेक गुन्ह्याप्रकरणी फरार असलेला सोनसाखळी चोर अक्रम खान एमडी पावडर खरेदीसाठी ठाण्यातील नितीन चौक येथे येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या (गुन्हे शाखा) वागळे इस्टेट युनीट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयदीप रणवरे यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून अक्रमला ताब्यात घेतले. तसेच, त्याच्याकडून 16 लाख 44 हजारांचा 822 ग्रॅम वजनाची एमडी पावडर जप्त केली. त्याने हा एमडीचा साठा मध्यप्रदेश, इंदोर येथील रईसउद्दीन सल्लाउद्दीन शेख (45) आणि अजय जाधवन यांच्याकडून घेतल्याची कबुली दिली. त्यानुसार दोघानाही अटक केली. त्यांच्या चौकशीत हा साठा मध्यप्रदेशच्या बैतुल येथील भोला नामक व्यक्तीकडून घेतल्याची बाब समोर आली. अक्रम हा साठा नाशिकमध्ये नेणार होता. या तिघांनाही न्यायालयात हजर केल्यावर अक्रम खान याला 8 जानेवारी तर, रईस आणि अजय या दोघांना 11 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, या त्रिकुटाविरोधात अंमली पदार्थ विरोधीचे गुन्हे दाखल आहेत का याचा तपास केला जात आहे.

Web Title: thane news md indore connection two arrested