ठाण्यात एसटीचालकाला मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

ठाणे - भिवंडी येथे मारहाणीत एसटी बसचालकाचा मृत्यू ओढवल्याची घटना ताजी असताना पुन्हा ठाण्यात क्षुल्लक वादात कारमधील चौकडीने एसटीचालकाला बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी (ता. 25) घडली. लक्ष्मण नामदेव कोळी (वय 40, रा. जळगाव) असे जखमी चालकाचे नाव आहे. मारहाण करणाऱ्या चौकडीसह कारचा शोध नौपाडा पोलिस घेत आहेत. खोपट एसटी विश्रांतीगृहात वास्तव्य करणारे कोळी हे एसटीचालक ठाणे ते बोरिवली परतीची फेरी संपवून बस खोपट आगारात घेऊन येत होते. तेव्हा सायंकाळी खोपट सिग्नलकडे जाणाऱ्या रस्त्यावर डावीकडे वळताना अचानक समोर आलेल्या कारला वाचवण्यासाठी कोळी यांनी बसचा अर्जंट ब्रेक लावला.

ठाणे - भिवंडी येथे मारहाणीत एसटी बसचालकाचा मृत्यू ओढवल्याची घटना ताजी असताना पुन्हा ठाण्यात क्षुल्लक वादात कारमधील चौकडीने एसटीचालकाला बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी (ता. 25) घडली. लक्ष्मण नामदेव कोळी (वय 40, रा. जळगाव) असे जखमी चालकाचे नाव आहे. मारहाण करणाऱ्या चौकडीसह कारचा शोध नौपाडा पोलिस घेत आहेत. खोपट एसटी विश्रांतीगृहात वास्तव्य करणारे कोळी हे एसटीचालक ठाणे ते बोरिवली परतीची फेरी संपवून बस खोपट आगारात घेऊन येत होते. तेव्हा सायंकाळी खोपट सिग्नलकडे जाणाऱ्या रस्त्यावर डावीकडे वळताना अचानक समोर आलेल्या कारला वाचवण्यासाठी कोळी यांनी बसचा अर्जंट ब्रेक लावला. याचा राग आल्याने कारमधील चौघांनी कोळी यांना बसच्या कॅबिनमध्ये घुसून व खाली खेचून मारहाण केली. याप्रकरणी तक्रार नौपाडा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. 

Web Title: thane news msrtc