'सीडीआर'प्रकरणी पोलिस दिल्लीत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

ठाणे - मोबाईल कॉल तपशीलाच्या नोंदी (सीडीआर) बेकायदा काढल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांनाही पोलिसांनी अटक केली असून, मुख्य सूत्रधार सौरभ साहू याचा शोध ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घेत आहे. यासाठी पोलिसांची तीन पथके दिल्लीला रवाना झाली आहेत.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सौरभ साहू हा मूळचा दिल्लीचा आहे. साहूला यापूर्वी मुंबई पोलिसांनी अटक केली होती, तो जामिनावर असून, तो यातील सराईत गुन्हेगार आहे. "सीडीआर' प्रकरणात सात मोबाईल कंपन्या व काही विमा कंपन्यांचाही यात सहभाग आहे. यासर्वांच्या मागावर ठाणे पोलिसांचे पथक आहे. साहूच्या अटकेने अनेक खुलासे होतील, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

दरम्यान, अटकेतील खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आतापर्यंत लग्नापूर्वीची मुले व मुलींची माहिती, लग्नानंतर पती-पत्नीची माहिती, अशी अनेक प्रकरणे निकाली काढल्याचे सांगण्यात येते; मात्र कोणत्या प्रकरणात त्यांना "सीडीआर'ची आवश्‍यकता भासली, हा प्रश्‍न पोलिसांसमोर आहे. ठाणे पोलिसांची तीन पथके वेगवेगळ्या कामगिरीवर आहेत. त्यातील एक पथक दिल्लीत मुख्य सूत्रधार साहूच्या मागावर आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: thane news mumbai news mobile call cdr police delhi