मुंबईत वाँटे़ड असलेले दोघे अट्टल घरफोडे जाळ्यात

दीपक शेलार
शनिवार, 6 जानेवारी 2018

ठाणेः मुंबईत वाँटे़ड असलेली अट्टल घरफोडी करणारी दुकली ठाणे पोलिसांच्या जाळ्यात सापडली आहे. राजेश शेट्टीयार उर्फ शेट्टी रा. कांदिवली आणि लोगो उर्फ लोकनाथ शेट्टी (रा. कांजुरमार्ग) अशी आरोपींची नावे असून, त्यांच्याकडून साडे चार लाखांचा सोन्याचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. या दुकलीविरोधात मुंबई, ठाण्यात 15 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून दोघांनीही घरफोड्यांचा उच्छाद मांडला होता, अशी माहिती अप्पर पोलिस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली.

ठाण्यातील श्रीनगर येथील घरफोडीचा तपास श्रीनगर आणि वागळे इस्टेट (गुन्हे शाखा) युनीट 5 यांच्याद्वारे समांतररित्या सुरु होता. त्यानुसार लावलेल्या सापळ्यात दोघेही अट्टल घरफोडे पोलिसांच्या जाळ्यात सापडले. दुकलीने श्रीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचा गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून घरफोडीतील साडे चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. राजेश याच्यावर मुंबईतील विलेपार्ले पोलिस ठाण्याच्या हद्दीत 4 घरफोडीचे गुन्हे दाखल असून मुंबईत तो वाँटे़ड आहे. सदराची कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराज रणवरे, पोलिस उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे, पोलिस नाईक गायकवाड, आर. आर. पाटील, रुपवंतराव शिंदे, राजेश क्षत्रिय, दिलीप शिंदे आदीच्या पथकाने केली.

Web Title: thane news mumbai wanted two arrested