पत्नीनेच केली पतीची हत्या 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

शहापूर - प्रेमसंबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकर आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीने पत्नीनेच हत्या केल्याची घटना शहापूर तालुक्‍यातील डिंभे येथे घडली. याप्रकरणी पत्नीसह पाच जणांच्या मुसक्‍या शहापूर पोलिसांनी काही तासांतच शिताफीने आवळल्या. 

शहापूर - प्रेमसंबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकर आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीने पत्नीनेच हत्या केल्याची घटना शहापूर तालुक्‍यातील डिंभे येथे घडली. याप्रकरणी पत्नीसह पाच जणांच्या मुसक्‍या शहापूर पोलिसांनी काही तासांतच शिताफीने आवळल्या. 

डिंभे येथील दीपक आमले (वय 35) घरातून निघाला तो परतलाच नसल्याने तो बेपत्ता झाल्याची तक्रार शहापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. दीपकचा मृतदेह गुरुवारी (ता. 22) डिंभे गावाजवळील तानसा नदीत सापडला. त्याच्या गळ्यावरील व्रणांमुळे त्याची हत्या झाल्याचा संशय दीपकचे वडील आणि नातेवाइकांनी व्यक्त केला होता; तर त्याची गळा आवळून हत्या झाल्याचे उत्तरीय तपासणीत निष्पन्न झाल्याने पोलिस निरीक्षक महेश शेट्ये आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या दिशेने तपास सुरू केला. याबाबत दीपकची पत्नी दीपिका हिचे प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर चौकशीमध्ये पोलिसी खाक्‍या दाखवताच दीपिकाने गुन्हा कबूल केला. याप्रकरणी दीपिका, तिचा प्रियकर प्रसाद व त्याचे साथीदार शब्बीर ऊर्फ बाळा अहमद शेख (तलवाडा, वाशाळा), हेमंत शिवाजी राऊत (गोठेघर), तुषार श्‍याम अधिकारी (वाफे) या पाच जणांना अटक केली आहे. 

घरातच केली हत्या 
दीपक घरात रात्री झोपला असताना त्याची पत्नी दीपिकाने प्रियकर प्रसाद पंडित संते (गोठेघर) याला फोन करून बोलावून घेतले. तो त्याच्या साथीदारांसह डिंभे येथे आला. दीपक झोपलेला पाहून दोरीने गळा आवळून त्याची हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी दीपकला पुलावरून तानसा नदीत फेकून दिले.

Web Title: thane news murder

टॅग्स