ठाण्यात कंटेनर पलटी, रस्त्यावर तेलच तेल...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

जेएनपीटी येथून सिल्वासा येथे जात असलेला कंटेनर घोडबंदर रस्त्यावर पातली पाडा पूल येथे अचानक कोसळला. कंटेनर कोसळल्याने सर्व तेल रस्त्यावर सांडले होते, त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेत 35 वर्षीय जितल पटेल हा कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला आहे त्याचवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

ठाणे : ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावरील पातली पाडा येथे तेलाने भरलेला कंटेनर पलटी झाल्याने रस्त्यावर तेलच तेल झाले होते. कंटेनर हटविण्यात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. 

जेएनपीटी येथून सिल्वासा येथे जात असलेला कंटेनर घोडबंदर रस्त्यावर पातली पाडा पूल येथे अचानक कोसळला. कंटेनर कोसळल्याने सर्व तेल रस्त्यावर सांडले होते, त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेत 35 वर्षीय जितल पटेल हा कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला आहे त्याचवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अपघातानंतर कंटेनर हटविण्यास अडीच ते तीन तास लागले. रस्त्यावर तेल सांडल्याने अग्निशमन दलाकडून तेल काढण्याचे काम करण्यात आले. तेल देखील साफ करण्यात आले आहे. त्यानंतर वाहतूक कोंडी फुटण्यास मदत झाली आणि वाहतूक पूर्ववत करण्यात आली. 

Web Title: Thane news oil tanker collapsed