वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

ठाणे - घोडबंदर येथील ओवळा नाका भागात वृद्ध व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. 25) घडली. निहार सरकार (वय 78) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. सरकार हे ओवळा येथील पुष्पांजली इमारतीत मुलगा, पत्नी आणि सून यांच्यासोबत राहत होते.

रविवारी घरातील सर्व जण कामानिमित्त बाहेर गेले होते. तेव्हा त्यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. निहार यांच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे असून, त्यांच्या मुलाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण मोबाईलवर पाहिले, तेव्हा हा प्रकार लक्षात आला. त्याने त्वरित पोलिसांना हा प्रकार कळवला. आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही, असे कासारवडवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. ढोले यांनी सांगितले.

Web Title: thane news old man suicide